सिडको हल्ला प्रकरणी 12 संशयित अटकेत ; तीन अल्पवयीनांचा समावेश

0
46

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिकमध्ये सिडको परिसरात झालेल्या तरुणावरील हल्ल्याच्या घटने प्रकरणी 12 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

नाशिक शहरात गुन्हेगारी प्रवृत्तींचा उच्छाद वाढला आहे. यात आत्तापर्यंत बऱ्याच हल्ल्याच्या, हत्येच्या घटना घडल्या. नुकतेच सिडको परिसरात देखील एका तरुणावर काही मुलांच्या टोळक्याने हल्ला करत, हत्याराने वार केले. यातील 12 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

नाशिक शहरात सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांद्वारे गैर घटनांनी मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे. त्यात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

12 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास सिडको मधील रायगड चौक येथे काही गुन्हेगारांच्या टोळक्याने मोहन बाळकृष्ण देवकर या युवकावर हल्ला करण्यात आला होता. त्यात संबंधित गंभीर जखमी झाला होता. ज्याच्यावर सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणातील 12 जणांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. ज्यात अल्पवयीनांचा देखील समावेश असल्याची माहिती अंबड पोलिसांनी दिली आहे.
नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. एक प्रकरण मिटत नाही, तोपर्यंत लगेच दुसरे प्रकरण समोर येत असल्याने, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

सिडको येथील रायगड चौकात झालेल्या या हल्ल्यातील संशयितांवर कारवाई करण्याचे आदेश अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांनी दिले आहेत.

नाशकात वाढत चाललेल्या या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाढीने पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. एका मागे एक असे प्रकार नाशिक शहरात वाढतच जात असल्याने, नागरिक भयभीत झाले आहेत.

आता या संबंधितांवर काय कारवाई केली जाते. याकडे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचलीत का?

दुसरं काही स्वस्त होवो न होवो,पण दारू मात्र स्वस्त होणारच. तसा निर्णयच महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

मद्य प्रेमींसाठी ही एक अतिशय आनंदाची अशीच बातमी आहे. महाविकास आघाडी सरकारने मद्यावरील कर कमी केला आहे. आणि तोही तब्बल 150 टक्क्यांनी. यामुळे ही मद्य प्रेमींसाठी मोठी पर्वणी असणार आहे.

येणाऱ्या ख्रिसमस आणि नववर्षाला मद्य प्रेमींना आता मद्य खूपच स्वस्त भेटणार आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेला हा निर्णय मद्य प्रेमींसाठी मोठी पर्वणीच आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

आता दारुवरच चालवायच्या का गाड्या? ; दारू पुन्हा झाली स्वस्त


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here