Political News | निवडणुकीआधीच काँग्रेसला फटका; आ. हिरामण खोसकरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

0
61
#image_title

Political News | ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला फटका बसला असून काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी सोमवार दि. 14 ऑक्टोबर रोजी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. देवगिरी या अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थिती खोसकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश पार पडला.

Political News | अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवारांनी केली मोठी घोषणा

ही आमच्या कामांची पोचपावती.. 

यावेळी अजित पवारांनी “पाच वर्षांपूर्वी आम्हाला इगतपुरी मतदारसंघा काँग्रेसला द्यावा लागला, परंतु खोसकरांच्या माध्यमातून मी इगतपुरी, त्रंबकेश्वर या विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत आलोय. त्यातूनच आमच्यात संबंध वाढत गेले. एक आदिवासी समाजामध्ये काम करणारा चांगला कार्यकर्ता म्हणून खोसकारांची ओळख आहे. चांगल्या प्रकारची भावना सतत मनामध्ये ठेवून त्यांचा यापुढे देखील सन्मान ठेवला जाईल. असे म्हणत “राष्ट्रवादीचे विकासाभिमुख विचार स्वीकारत खोसकर यांनी आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आमदार खोसकर यांचा प्रवेश म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही चालवलेल्या कामांची व लोकोपयोगी योजनांची एक पोचपावतीच आहे.” असे यावेळी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here