Malegaon | मालेगावात सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे ‘भिक मागो’ आंदोलन 

0
26
#image_title

Malegaon | सार्वजनिक नागरी सुविधा समिती तर्फे आज दुसऱ्या दिवशी देखील सरदार चौक मालेगाव येथे भीक मांगो आंदोलनात करण्यात आले. सरदार चौकातून गुळ बाजार मार्गे मालेगाव महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर देण्यात आला. या ‘भीक मांगो’ आंदोलनात प्रतिकात्मक हत्तीची मिरवणूक काढण्यात आली होती. महापालिकेच्या भ्रष्टाचाराचारमुळे जनतेच्या हिताची विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध नाही, महापालिकेचा हा हत्ती पोहोचण्यासाठी भीक द्या असे आव्हान या रॅलीत करण्यात येत होते.

Malegaon | बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज मालेगाव बंद

सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या मागण्यांवर चर्चा

मनपा प्रवेश दारावर रामदास बोरसे, निखिल पवार, देवा पाटील, भरत पाटील, कैलास शर्मा यांची भाषणे झाली. मनपा आयुक्त रवींद्र जाधव, अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे, शहर अभियंता कैलास बच्छाव, अग्निशामन अधीक्षक संजय पवार, किल्ला पोलीस स्टेशनचे निरीक्षक डोईफोडे यांच्या उपस्थितीत सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या मागण्यां संदर्भात चर्चा करण्यात आली. आयुक्त जाधव यांनी आश्वासन दिले की, “येथे आठवड्यात प्रतिवर्षी पाच टक्के पाणी पट्टी वाढ रद्दबाबतचा निर्णय होईल तसेच इस्लामाबादकडे जाणारी पाईपलाईनचे दोन दिवसात काम सुरू करण्यात येईल, पार्किंग झोन बाबत व इतर मागण्यांबाबत तात्काळ पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.

Malegaon | मालेगाव मनपात स्थानिक कर्मचारी भरती करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

आंदोलनावेळी ‘हे’ कार्यकर्ते उपस्थित

यावेळी रामदास काका बोरसे, निखिल पवार, देवा पाटील, भरत पाटील, कैलास शर्मा, भालचंद्र खैरनार, निलेश पाटील, चेतेश आसेरी, श्याम भावसार, चेतन साकला, मुरलीधर पाटकर, कलीम खजूर वाले, वाहिदभाई हाजी, अख्तर भाई, मनोज मंदार आदी सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here