सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | पुणे येथे झालेल्या बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत पणन मंत्री ना अब्दुल सत्तार यांनी उपस्थित सभापती, सचिवांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल देवळा बाजार समितीच्या वतीने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
Deola | अवैधरित्या गोमांसाची वाहतूक करणारे वाहन गोरक्षक संघटनेच्या हाती; आरोपी फरार
पत्रकाचा आशय असा की, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार (दि. 03) रोजी ग.दि.माडगूळकर नाट्यगृह, प्राधिकरण, निगडी, पुणे या ठिकाणी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती व सचिव यांचेशी संवाद साधुन त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. सदर परिषदेस राज्याचे मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार होते. परंतु कॅबिनेट बैठकीमुळे ते सदर परिषदेस उपस्थित राहीले नाही.
बाजार समितीच्या सभापती सचिवांसोबत गैरवर्तवणूक
त्यानुसार सदर परिषदेस राज्याचे अल्पसंख्यांक विकास, औकाफ व पणन मंत्री अब्दुल सत्तार हे व इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच सदर परिषदेमध्ये राज्यातील बाजार समित्यांचे सभापती व सचिवांसमवेत देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, उपसभापती शिवाजी अहिरे, सचिव माणिक निकम हे उपस्थित होते. त्यानुसार राज्यातील बाजार समित्यांचे प्रतिनीधींनी त्यांच्या अडचणी अब्दुल सत्तार यांना सांगितल्या असता त्यांनी सदर परिषदेमध्ये राज्यातील बाजार समितीचे सभापती व सचिवांचा अपमान करुन त्याठिकाणी सर्वांशी गैरवर्तन केले व सदर परिषद अर्ध्यावर सोडुन निघुन गेले. त्यामुळे सदर घडलेल्या प्रकाराबाबत महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने अब्दुल सत्तारांविरोधात निषेधाचा ठराव करण्यात आला व त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
Deola | देवळ्यात मोबाईल चोरांचा सुळसुळाट; चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
सोमवारी बाजार समित्या बंद
तसेच याप्रसंगी रास्तारोको देखिल करण्यात आला. या विषयाची तक्रारी बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली जाणार असुन अब्दुल सत्तार यांनी बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या गैरवागणुकीबद्दल त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजिनामा द्यावा. या मागणीसाठी व घडलेल्या प्रकाराचा निषेध म्हणुन राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्या सोमवार( दि. 07) रोजी कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम