Nashik News | दादा भुसेंच्या प्रयत्नांना यश; मालेगावात डाळिंब इस्टेटला मंजुरी

0
53
Dadaji Bhuse
Dadaji Bhuse

Nashik News | महाराष्ट्रामध्ये फलोत्पादनासाठी अनुकूल वातावरण असल्याने राज्यातील विविध भागांमध्ये विविध फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यात नाशिक जिल्ह्यात कांदा आणि द्राक्ष पिकांनंतर सटाणा, मालेगाव, नांदगाव, देवळा या तालुक्यांमध्ये डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

नाशिक जिल्ह्यामध्ये 30 हजार हेक्टर क्षेत्रात डाळिंब फळबाग लागवड करण्यात येते. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात डाळिंब इस्टेटची स्थापना व्हावी यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळील निळगव्हाण येथे 5.78 हेक्टर क्षेत्रावर डाळिंब इस्टेटची स्थापना करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी 98 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Nashik News | देवळा व चांदवड तालुक्यात आज महारोजगार मेळाव्याचे आयोजन

डाळिंब इस्टेटचा शेतकऱ्यांना फायदा

त्यामुळे आता डाळिंब ज्यूस उत्पादित करणे, डाळिंबाचे दाणे वेगळे करून फ्रोजन करून निर्यातीस चालना देणे, डाळिंब फळ प्रक्रिया साठवण, पॅकेजिंग, मार्केटिंग यांसारख्या अनेक बाबी या डाळिंब इस्टेटमध्ये शक्य होणार असून डाळिंब पिकाची उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर साठवणूक प्रक्रिया सुविधांचा विस्तार होईल, निर्यातक्षम व गुणवत्ता पूर्ण कलमे विकसित करण्यासाठी देखील याची मदत होणार आहे. त्यामुळे नक्कीच जिल्ह्यामधील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून त्यांच्या उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी याचा उपयोग होणार आहे.

Nashik News | नाशिकमधून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत या तीन नावांची चर्चा

दादा भुसे आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून सरकारचे आभार 

त्याचप्रमाणे, डाळिंब इस्टेट अंतर्गत मोठ्या प्रमाणात रोगमुक्त व गुणवत्ता पूर्ण डाळिंब कलमे उत्पादन करणे, निर्यातीसाठी नवीन वाणाची आवश्यकता व निर्यातक्षम उत्पादन करणे, वाजवी दरात यांत्रिकीकरणाची सुविधा निर्माण करणे, डाळिंब लागवडीसाठी इंडो-इस्त्राईल तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, काढणी पश्चात व्यवस्थापन सुविधा निर्माण करणे, स्थानिक गरजांनुसार शेतकऱ्यांना डाळिंब बहराबाबत कीड व रोग व्यवस्थापन प्रशिक्षण देणे. या बाबी सहज शक्य होऊ शकणार आहेत. दरम्यान, या प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल मंत्री दादा भुसे आणि नाशिक जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आभार मानले आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here