Manoj Jarange | आठ दिवसांनंतर मनोज जरांगें कडून उपोषण सोडण्याची घोषणा!

0
54
Manoj Jarange
Manoj Jarange

Manoj Jarange | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा नेते मनोज जरांगें पाटील यांचे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील गावात उपोषण सुरू असून आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस होता. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती त्यामुळे मराठा बांधवांशी मनोज जरांगें यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबतची मागणी पुन्हा एकदा मांडत उपोषण मागे घेण्याबाबत उपस्थित मराठा बांधवांना विचारणी केली. त्यानंतर मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर, “आपल्या जातीशी आणि लेकरांशी धोका करून पुन्हा कोणत्या नेत्याच्या मुलाला मोठं करू नका.” असं म्हणत तिथे जमलेल्या मराठा बांधवांना विनंती केली.

Manoj Jarange | “तुमचे बारा-तेरा वाजवल्याशिवाय..”; जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

अखेर जरांगे यांचे उपोषण स्थगित

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले. त्यानंतर राज्यभरातून मराठा समाज आंतरवालीकडे येऊ लागला. त्यामुळे आता जरांगेंनी 5 वाजता उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगेना भेटण्यासाठी दररोज मराठा बांधव मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीकडे येत असतात. त्याचप्रमाणे आज मुस्लिम समाज बांधवांनी देखील त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंती देखील केली. मुस्लिम बांधवांना यावेळी अश्रू अनावर झाले.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे

“मला दहा-बारा दिवस आरामाची गरज असल्यामुळे मी आता हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. तेव्हा दवाखान्यात कोणी येऊ नका. मी जरा आराम करतो. त्यानंतर अंतर्वलीला आलो की भेटू. ज्यांनी त्रास दिला त्यांना सरळ करणार आहे.” असं म्हणत जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे. तर “फडणवीसजी तुम्ही हाताने सत्ता घालवू नका.” असं म्हणत फडणवीसांवरही निशाणा साधला आहे.

Manoj Jarange | ‘बहिणींना पैसे दिलेत मात्र…’; मनोज जरांगेंनी लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा सरकारला डिवचले

न्यायालयाच्या आदेशानुसार उपचार घेऊन उपोषण करण्यापेक्षा उपोषण सोडावे का? असा प्रश्न जरांगेंनी मराठा समाजाला विचारला होता. त्यानंतर त्यांना समाजाने सकारात्मकता दाखवली व जरांगे पाटलांनी पाच वाजता उपोषण सोडणार असल्याचे जाहीर केले. मराठा बांधव आंतरवलीत येणार असून त्यांच्या उपस्थितीत जरांगे उपोषण सोडणार आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here