सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | तालुक्यातील मेशी येथील माजी उपजिल्हाप्रमुख मधुकर अहिरे यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी अहिरे यांना नियुक्ती पत्र दिले.
Deola | खर्डे येथे “स्वच्छता हि सेवा” अभियान
अहिरे यांनी मागील 40 वर्षे केली समाजसेवा
गेल्या चाळीस वर्षापासून अहिरे यांनी समाज सेवा केली असून, त्यांच्या कार्याची दखल घेत माजी मंत्री घोलप यांनी त्यांच्यावर ग्रामीण जिल्ह्याची जबाबदारी टाकली आहे. तर देवळा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या देवळा तालुका शहर प्रमुखपदी गणेश पवार यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
Deola | परिपूर्ण आणि संतुलित जीवनसाठी चांगले मानसिक आरोग्य राखणे गरजेचे – प्राचार्य डॉ. रसाळ
समाज संघटन करण्यावर भर
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख आनंदा महाले, राष्ट्रीय सचिव दत्तात्रेय गोतीशे, राज्य सचिव अनिल कानडे, राजु आहेर, भाऊसाहेब चव्हाण, देवळा तालुका प्रमुख शिवाजी अहिरे, युवाचे सुमित शेवाळे, नाशिक जिल्हा संघटक भास्कर अहिरे आदी उपस्थित होते. यापुढे गाव तेथे शाखा स्थापन करून समाज संघटन करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी नवनियुक्त ग्रामीण अध्यक्ष मधुकर अहिरे यांना सांगितली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम