सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | बी.एच.आर पतसंस्थेच्या देवळा सह राज्यातील सर्व शाखेत चांगला मोबदला मिळेल या उद्धेशाने अनेक नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ठेवी जमा केल्या असून, संस्थापक अध्यक्ष व संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे पतसंस्था गेल्या अनेक वर्षांपासून बंद झाल्याने ठेवीदार संभ्रमात पडले असून, ठेवी तात्काळ परत मिळाव्यात अन्यथा कुठलीही पूर्व सूचना न देता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा सेवानिवृत्त प्राध्यापक आर. के.पवार यांनी एका प्रशिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.
Deola | देवळ्यात मोठ्या उत्साहाने गणेश विसर्जन सोहळा संपन्न
चांगला मोबदला मिळणार असा आमिष दाखवत ठेवी जमा केल्या
पत्रकाचा आशय असा कि, महाराष्ट्रातील अनेक नागरिकांनी जळगाव स्थित बी.एच.आर. पतसंस्थेतील अधिकार्यांनी ठेवीदारांना चांगला मोबदला मिळण्याचे आमिष दाखवत या अपेक्षेने तरुण नोकरदार, निवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांनी पै-पै जोडून जमा केलेली रक्कम मग ती मुलीच्या लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, शेती पूरक धंद्यासाठी, निवृत्ती नंतरचे जीवन सुखी जावे या व इतर अनेक स्वप्नांसाठी या संस्थेत ठेवी जमा केल्या आहेत. यातून परतावा चांगला मिळेल अशी स्वप्न पाहत असतांनाच संस्थेच्या भ्रष्ट कारभारामुळे एका रात्रीतून सर्व चित्र पालटले व होत्याचे नव्हते झाले. सर्व शाखा बंद झाल्या, कर्मचारी गायब, संचालक मंडळ नॉटरिचेबल यामुळे बहुतांश ठेवीदारांना याचा मानसिक धक्का बसल्याने त्यांनी आपले जीवन संपवले आहे. तर काही आशेवर जगत राहिले असून, अद्याप त्यांना आपल्या ठेवी परत मिळाल्या नाहीत. शासनाने याची दखल घेऊन विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा विचार डोळ्यांपुढे ठेवून त्वरीत ठेवी परत करून त्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.
Deola | देवळा कळवण रोडवर दोन वाहनांच्या धडकेत तरुण जागीच ठार
ठेवी परत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
दरम्यान, येत्या दि. २५ सप्टेंबर पर्यंत सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत न मिळाल्यास आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी पतसंस्था संचालक व महाराष्ट्र शासनांवर असेल तरी कृपया हि वेळ येणार नाही याची संबंधीतांनी दक्षता घ्यावी व कोणत्याही ठेवीदारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये व ज्येष्ठांना आंदोलनासाठी भाग पाडू नये. अशी विनंती सर्व ठेवीवारांच्या वतीने निवृत्त प्रा.आर. के. पवार देवळा यांनी केली आहे. तसेच आंदोलनाच्या पुढील रुपरेषेसाठी प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम