Political News | सध्या राजकीय वर्तुळात विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावरून राजकारण सुरू आहे. त्यात महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी चुरस लागलेली दिसत असून मविआने मात्र अजून पर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा गुपितच ठेवला आहे. त्यात काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मविआने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा. अशी मागणी केली होती. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने ही मागणी धुडकावली. त्यानंतर ठाकरे गटाने या मागणीचा जोर कमी केला. तेव्हा आता राज्यात महिला मुख्यमंत्रीपदावरही चर्चा होऊ लागली आहे. त्यामध्ये रश्मी ठाकरे यांचेही नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मोठा वक्तव्य केला आहे.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर ?
नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ‘राज्याला महिला मुख्यमंत्री मिळणार का?’ या प्रश्नावर “रश्मी ठाकरेंना राजकारणात रस नाही” असे सांगितले. “त्यांनी याअधी राजकारणात इंटरेस्ट घेतला नाही. त्या त्यांच्या पतीसोबत असतात म्हणजे त्या राजकारणात आहेत असे नाही. तेव्हा राज्यात महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत. पण कारण नसताना रश्मी ठाकरे यांचे नाव घेतले जाणे चुकीचे आहे.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार?
मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महिला मुख्यमंत्री हा विषय नेहमीच चर्चेत राहिला असून आजपर्यंत राज्यात एकही महिला मुख्यमंत्री झालेले नाही. त्यामुळे प्रत्येक निवडणूक सत्ता स्थापनेमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत अनेक नावे चर्चेत येत असतात. मागील काळात पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे आणि इतर नावेही चर्चेत राहीली होती. रश्मी ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या पत्नी असून त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घेतला नसला, तरी पक्ष संघटनेत रश्मी ठाकरे यांचे लक्ष असल्याचे बोलले जाते.
Political News | नरहरी झिरवाळ मुख्यमंत्र्यांवर नाराज; थेट राजीनाम्याचा दिला इशारा
त्या सुप्रिया सुळे या दिल्लीत खासदार म्हणून निवडून गेले असले, तरी ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची चर्चा होते, तेव्हा त्यांचे नावही आघाडीवर असते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले असून सुप्रिया सुळे प्रामुख्याने राज्यात सक्रियपणे फिरत असतात. तेव्हा भविष्यात सुप्रिया सुळे यांना शरद पवारांकडून मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले जाण्याची चर्चा होत आहे. तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं म्हणत पंकजा मुंडे यांचे बॅनर्स राज्यात लागलेली दिसतात. राज्यामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री पदासाठी नाव पुढे आलं होतं. परंतु त्यांना मुख्यमंत्री केले गेले नव्हते. परंतु ओबीसी आणि वंजारी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे राज्यातील महिला मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अजूनही कायम आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम