Political News | रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयावरून आता महायुतीमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पक्षाकडून केल्या गेलेल्या काही घोषणा आता त्यांच्या अडचणी ठरू लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून आदिवासी घटकातील आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. हेच आश्वासन आता राज्य सरकारची अडचण ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णयामुळे महायुतीतील आदिवासी आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नरहरी झिरवळांनी दिला आंदोलनाचा इशारा
आदिवासी घटकांमध्ये सध्या 45 घटक असून त्यात धनगर 46ळ वा घटक येऊ शकणार नाही. त्याला सर्वोच्च न्यायालयाने देखील दुजोरा दिलेला आहे. तेव्हा धनगर समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षण कोणत्याही परिस्थितीत आदिवासी घटकातून दिले जाणार नाही.
भाजपाने लवकरात लवकर याबाबत स्पष्ट खुलासा करावा अन्यथा त्या विरुद्ध आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा महायुतीचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवळ यांनी दिला आहे. त्याचबरोबर राज्यातील आदिवासी आमदारांनी आपल्याशी संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष एन.डी गावितांनी पक्षाला घरचा आहेर दिला असून या संदर्भात लवकरच सर्व आदिवासी लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे. भाजपच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या अध्यक्षांना कळविण्यात आल्याचे गावित म्हणाले आहेत.
Political News | ‘त्या’ आमदारांची काँगेसकडून हकालपट्टी; काँगेसमधून बाहेर पडताच ‘भाजपवासी’ होणार..?
“मुख्यमंत्र्यांकडून धनगर आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाबाबतची भूमिका स्पष्ट न झाल्यास राज्यातील सर्व आदिवासी आमदार आणि खासदार एकत्र येऊन सरकार विरोधी भूमिका घेतील.” असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून सातत्याने विविध भुमिका मांडणाऱ्या भाजपची कोंडी होणार असल्याची चिन्हे आहेत. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच एकीकडे धनगर समाजाचे आरक्षण जलसमाधी आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे आदिवासी लोकप्रतिनिधी देखील सावध झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात महायुती सरकारचा चांगलाच कस लागणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम