Mahayuti Sarkar | मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीत रस्सीखेच?; गिरीश महाजनांच्या विधानाने वेधलं लक्ष

0
53
#image_title

Mahayuti Sarkar | विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून सर्वच पक्ष निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागली आहेत. त्यातच या निवडणुकीमध्ये दोन पक्ष विभागले गेल्यामुळे महायुतीत आणि महाविकास आघाडीत तीन-तीन पक्ष एकत्र लढत आहेत. तेव्हा कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरून सस्पेन्स राखून ठेवला आहे. मात्र महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरूच असल्याचे चित्र कायम आहे. राज्यात काही ठिकाणी अजित दादा हेच राज्याचे मुख्य असे बॅनर झळकतात, तर एकनाथ शिंदे हेच महायुतीचा खरा चेहरा असल्याचा दावा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता गिरीश महाजनांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मनातील ‘CM’ म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुती कोणाच्या चेहऱ्यावर मत मागणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Mahayuti Sarkar | शिंदेंच्या नेत्यांमुळे युतीत वादाची ठिणगी; शिंदे करणार आज नेत्यांची कानउघडणी..?

गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नांदेडमध्ये जोशात साजरा झाला. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते माता गुजरीची विसावा उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून पोलीस दलाकडून हवेमध्ये तीन फेऱ्या झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. या मुक्ती संग्राम सोहळ्यास खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह आमदार, सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

आरक्षण आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबाबत्ती केले भाष्य

“आम्ही शेतकऱ्यांना 450 कोटींची मदत दिली आहे. जे पंचनामे झाले त्याची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. मी सुद्धा दोन वेळा पाहणे केली आहे.” तसेच सर्व पंचनामे झाले असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली त्याचबरोबर “आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. सरकार सकारात्मक आहे. दहा टक्के आरक्षण सुद्धा आम्ही दिले आहे.” असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर “परवा धनगर समाजासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. मला ट्रॅफिक माहिती बैठकीला उशीर झाला. मी त्या बैठकीला अपेक्षित होतो परंतु त्यातून सकारात्मक चर्चा झाली असून धनगर समाज समाधानी झाला असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.

Mahayuti Sarkar | शिंदेंच्या मंत्र्यांमुळे युती फुटणार..?; अजित पवारांना युतीतून बाहेर पडण्याचा सल्ला

आमच्या मनातला मुख्यमंत्री एकच

मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? असे विचारले असता “आपणा सर्वांना कल्पना आहे, आपल्याकडे चेहरा एकच आहे. तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील पण आमच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्रजीच आहेत.” असे ते यावेळी म्हणाले त्याचबरोबर प्रतापराव पाटील चिखलीकर आमच्या सोबत आहेत. सगळं जग दावा करत आहे खंबीरपणे सोबत आहेत. सरकार शंभर टक्के तरल घोडा मैदान समोर आहे. पुढे काय काय होत ते बघा. पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. असे देखील ते म्हणाले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here