सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | येथील जाणीव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना यावर्षी ९ % लाभांश देण्यात येणार असून, थकबाकीदार सभासदांनी आपल्याकडील कर्ज वेळेत भरून कायदेशीर कारवाई टाळावी तसेच संस्थेच्या वतीने कर्ज वसुलीसाठी कडक धोरण अवलंबिले जात जाणार असल्याची माहिती चेअरमन भाऊसाहेब पगार यांनी दिली.
Deola | देवळ्यात चोरीच्या घटना थांबेना; बस स्थानकातून दुचाकी लांबवली
या संस्थेची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी दि. १६ रोजी श्रीराम मंदिरात खेळीमेळीच्या वातावरण पार पडली. यावेळी ते बोलत होते. संस्थेची सांपत्तिक स्थिती पुढीलप्रमाणे: सभासद- १९२५, खेळते भागभांडवल १७ कोटी ६ लाख ७१ हजार ५२५, वसूल भागभांडवल ७९ लाख ७६ हजार ७८०, एकूण ठेवी १३ कोटी ७२ लाख ३० हजार १४६, कर्ज वाटप १० कोटी ८७ लाख ९३ हजार ७४७, गुंतवणूक ४ कोटी २३ लाख ४८ हजार ८३०, स्वनिधी ८२ लाख ३७ हजार ३००, नफा २१ लाख ५२ हजार ६०५, थकबाकी नगण्य असून, सीडी रेशो ७१.८२ टक्के याप्रमाणे आहे.
संस्थेला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
संस्थेने नुकतीच उमराणे येथे विस्तारित शाखा सुरु केली असून, तत्पर सेवा मिळत असल्याने ग्राहकांचा उस्त्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. संस्थेने ठेवीदार, सभासदांचा विश्वास संपादन केल्याने अल्पावधीत प्रगती केली आहे. यामागे कर्मचारी वर्गाचा मोलाचा वाटा आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रात निवड झालेल्या सभासद व हितचिंतकांचा सत्कार करण्यात आला.
Deola | खासदार भास्कर भगरे यांची फांगदर शाळेस भेट
सभेत रवींद्र सावकार, प्रा. बापू रौंदळ, विलास शिरवाडकर, यांनी चर्चेत भाग घेतला होता. यावेळी व्हा. संस्थापक चेअरमन जितेंद्र आहेर, व्हा. चेअरमन लक्ष्मीकांत आहेर, मानद कार्यकारी संचालक नरेंद्र हिरे, समाधान आहेर, यशवंत आहेर, सुनील आहेर, पंकज सावकार, दावल भदाणे, अनिल आहेर, वसंत आढाव, विष्णू शेवाळे, सुलभा आहेर, भाग्यश्री पवार, ललित देवरे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहवाल वाचन व्यवस्थापक दिलीप आहेर यांनी केले तर संस्थापक चेअरमन जितेंद्र आहेर यांनी आभार मानले. सभा यशस्वीतेसाठी रोखपाल उमराणे शाखा व्यवस्थापक शुभम आहेर, वसुली अधिकारी शरद खैरनार, लिपिक योगेश निकम, केतन देवरे, दीपक आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम