Igatpuri : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील वासाळी, शिरेवाडी, मायदरा, धानोशी, ठोकळवाडी, घोडेवाडी, अडसरे, टाकेद सह परिसरात दि. २०/०८/२०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास जोरदार ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या भात लागवड केलेल्या जमिनी उभ्या पिकांसह खरडून धुऊन वाहून गेल्या. क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं आणि शेतकरी बांधवांच्या उरावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. यात शेतकऱ्यांच्या जमिनिसह पिकांचे मोठे नुकसान झाले असून आज मितीस येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिस्थितीची तहसीलदार यांनी प्रत्यक्षात पाहणी करून पंचनाम्यासह शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी व नुकसानभरपाईचा तसा आदेश काढावा. यासोबतच सप्टेंबर 2022 मध्ये देखील याच भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. यावेळी देखील या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनिसह पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.
Nashik crime | नाशिकमध्ये भर रस्त्यात गायीवर अत्याचार; 26 वर्षीय तरुणाला अटक
Igatpuri | शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई द्यावी
शेतकऱ्यांच्या नुकसानी संबंधित महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे देखील झाले होते. तसा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामानुकसानभरपाईचा अहवाल शासनाकडे सादर केला होता. तेव्हाची देखील नुकसानभरपाई शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळालेली नाही. तरी मागील दोन वर्षांची व गतवर्षीच्या नुकसानीची नुकसानभरपाई शेतकरी बांधवांना त्वरित देण्यात यावी अन्यथा आंदोलन उपोषणाशिवाय शेतकरी बांधवांकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. या मागणीचे निवेदन तहसीलदार अभिजित बारावकर यांना टाकेद परिसरातील शेतकरी बांधवांच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, दिलीप पोटकुले, सुदाम पेढेकर,दीपक भवारी,नवनाथ निर्मळ,बहिरू लगड,रमेश वारुंगसे,भास्कर कोरडे, संकेत पगारे आदींसह बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
Nashik Crime | धक्कादायक! नाशकात पित्याकडूनच गतिमंद मुलीवर अत्याचार
तहसीलदार आणि शिष्टमंडळा यांच्यात काय बोलणे झाले?
“यावर्षी ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे जमीन व पिकांचे नुकसान झाले त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मागील दोन वर्षीच्या नुकसानीची देखील माहिती घेऊन नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा केला जाईल. – अभिजित बारावकर ,तहसीलदार इगतपुरी
“सप्टेंबर 2022 मधील नुकसानीची अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. यांसह यावर्षी देखील अतिवृष्टीमुळे जैसे थेच परिस्थिती झाल्याने शेतकरी बांधवांवर अस्मानी संकट कोसळले असून आतातरी शासनाने शेतकऱ्यांचे डोळ्यातील अश्रू पुसावे व त्वरित आधारभूत नुकसानभरपाई देण्यात यावी अन्यथा आंदोलन उपोषणाशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय उरला नाही.” – राम शिंदे ,सामाजिक कार्यकर्ते टाकेद
“सलग तीन वर्षांपासून अशी जोरदार अतिवृष्टी होत असल्याने सोनोशी येथील शेतकरी हवालदिलं झाला आहे. उभ्या पिकांसह खरडून वाहून गेलेल्या जमिनी नेस्तनाबूत झाल्याने आतातरी शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणे काळाची गरज बनली आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी हीच माफक अपेक्षा आहे.” – ताई दिलीप पोटकुले , माजी सरपंच सोनोशी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम