BJP vs Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं युद्ध पाहायला मिळतंय. त्यातच आता शरद पवार भाजपासाठी आणखीन एक मोठा धक्का घेऊन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. तेव्हा शरद पवारांनी या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे पाहायला मिळते. ते सध्या राज्यातील विविध भागातील दौरे करत आहेत. अशातच भाजपातील काही नेते त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या नेत्यांच्या शरद पवार यांच्यासह गाठीभेटी होत असून, काही जण लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते.
Political News | महायुतीला मोठा धक्का; बडे नेते ‘ तुतारी ‘ फुंकणार..?
याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेते तुतारी फुंकण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.आधीच भाजपचा कोल्हापुरातील हुकूमाचा एक्का समरजीत घाटगे यांनी अप्रत्यक्षपणे पक्ष सोडण्याचे संकेत दिल्यापासून ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अहमदनगरमधील बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपला निवडणुकीआधीच मोठा फटका बसणार असल्याचे आता समोर येत आहे.
कोण आहेत हे दोन बडे नेते?
अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे विवेक कोल्हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. तर पुण्यातील इंदापूरचे भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे देखील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हा आता कोल्हापूर बरोबरच पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातही भाजपला निवडणुकीआधीच मोठा फटका बसणार असल्याचं समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आज विवेक कोल्हे शरद पवार यांची भेट घेणार असून विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत आणि उमेदवारी बाबत चर्चा केली जाणार असल्याची शक्यता आहे.
Assembly Elections | विधानसभेसाठी मविआ सज्ज..!; जागा वाटपाबाबत महत्त्वाचे निर्णय
पवार-कोल्हेंची भेट राजकारणात कोणत वादळ आणणार?
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्हीएसआय बैठकीच्या निमित्ताने शरद पवार व विवेक कोल्हे एकत्र येणार आहेत. यावेळी विवेक कोल्हे आणि शरद पवार यांच्यामध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे. विवेक कोल्हे कोपरगाव मधून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते, परंतु अजित पवारांनी कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना उमेदवारी निश्चित केली. त्यामुळे विवेक कोल्हे यांची कोंडी झाली असून बऱ्याच दिवसांपासून ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. तेव्हा विवेक कोल्हे यांनी जर शरद पवार गटात प्रवेश केला तर कोपरगावमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत होणार असल्याचे चित्र समोर येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम