Assembly Elections | विधानसभेसाठी मविआ सज्ज..!; जागा वाटपाबाबत महत्त्वाचे निर्णय

0
44
Assembly Elections
Assembly Elections

Assembly Elections | महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून सत्ताधारी व विरोधक जोमाने निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. 2022 मध्ये राज्यामध्ये भाजप शिंदे सरकार स्थापन झाले. त्याच्या अगदीच पुढच्या वर्षातच अजित पवार महायुतीत सहभागी झाले. या सत्तास्थापनेने राज्याचे राजकारण वेगळ्या पातळीवर नेले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे दोन नवीन पक्ष स्थापन झाले.

परंतु या येत्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा तीन पक्षांना घेऊन सरकार स्थापन करणे तितकेसे सोपे नाही. लोकसभेच्या निकालानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतले नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यात जागावाटपावरून सत्ताधारी पक्षामध्ये धुसमूस सुरू असून शिंदे गट व अजित पवार गट यांच्यामधील बरेच जण पूर्वीच्या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याच्या व उत्सुक असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

Aaditya Thackeray | भुजबळ, कांदेंच्या विरोधात ठाकरेंची तोफ कडाडणार; कोणाला बळ देणार..?

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे काम पूर्ण झाल्याची माहिती असून मविआ येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे सांगितले जात असून या निवडणुकांमध्ये लोकसभेप्रमाणे यश प्राप्त करून सत्तापालट करण्याचा महाविकास आघाडीचा मनसुबा असल्याचा उघड उघड स्पष्ट होत आहे.

सत्ताधारी पक्षावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निवडणुका लांबणीवर टाकल्याचे आरोप केले जात आहे. परंतु निवडणुका लांबणीवर गेल्या असल्या तरी मविआ मात्र संपूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरणार आहे. जागा वाटपासाठी जवळजवळ तीनही पक्षांचे एक मत झालेले असून विधानसभेत मुंबईमध्ये मविआ 36 जागा लढवणार असून त्यातील 15 शिवसेना उद्धव ठाकरे गट, 14 काँग्रेस तर 7 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मित्रपक्ष अशा क्रमाने विभागून देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Assembly Elections |  लोकसभेच्या निकालावर विधानसभेची तयारी

सूत्रांनुसार, विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये लोकसभा निकालांच्या आधारावर जागावाटप केले जाणार असून लोकसभेत निवडून आलेल्या सहा जागांपैकी विजयी पक्ष तीन जागा लढवणार असून उर्वरित तीन जागांपैकी दोन जागा मविआतील दोन नंबर वर असलेला पक्षाला लढवणार आहे व एक जागा मित्र पक्षाला दिली जाण्याची शक्यता आहे.

जागा वाटपाचा नेमका फॉर्मुला काय? 

लोकसभेत मुंबईमध्ये मविआने सहा पैकी चार जागा जिंकल्या होत्या. याच गोष्टीस नमूद करत महाविकास आघाडीने विधानसभेसाठी आपला विजयी फॉर्मुला तयार केला आहे. मविआतील एका नेत्यानं हा 3-2-1 चा फाॅर्मुला स्वीकारणार आला असल्याचे सांगितले. त्यामध्ये विजयी पक्षाला 3 ते 4 जागा तर उर्वरित जागा महाविकास आघाडीतील दुसरे पक्ष व मित्रपक्ष यांच्यामध्ये संख्या बाळाच्या आधारावर विभागून दिल्या जातील. तसेच या फॉर्मुलाला तिन्ही पक्षांनी स्वीकार केल्याचेही त्यांनी सांगितले.

Press Conference | अजित पवार घेणार महत्त्वाची पत्रकार परिषद…. काय वळण घेणार महाराष्ट्राचा राजकारण?

शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जास्त जागा मिळणार..?

जागा वाटपाबाबत व्यवस्थित चर्चा करता यावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्ली गाठली होती. यावेळेस त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. “जागा वाटपाबाबत निश्चित रहावे. विजयाची अपेक्षा सर्वांना समानच आहे.” हा संदेश त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांना देण्यात येत आहे. ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी लोकसभेच्या निकालांच्या आधारे लढवणार असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जास्त जागा येण्याची दाट शक्यता आहे. त्यात मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 36 जागांपैकी वीस जागांवर आघाडी दर्शवली. 2019 च्या निकालाकडे पाहिल्यास शिवसेना-भाजप युतीने 19 जागा लढवून 14 जागांवरती विजय मिळवला होता. याउलट काँग्रेसने मात्र 29 पैकी फक्त 4 जागा जिंकल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण सहा पैकी एका जागेवर यश मिळवलं होतं. या सर्व गोष्टींचा अभ्यास करता मुंबईमध्ये शिवसेना आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत असल्यामुळे शिवसेनेच्या झोळीत जास्त जागा पडू शकतात.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here