Ravikant Tupkar | ‘या वेळेचं शेतकरी आंदोलन न भूतो न भविष्यती असेल’; रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा

0
26

Ravikant Tupkar : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहेत. सत्ताधारी, विरोधक, अपक्ष सर्वांनी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कंबर कसल्याचे पाहायला मिळते आहे. याच अनुषंगाने सर्व पक्षांच्या नेत्यांकडून मतदार संघाचा आढावा व पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यांचे आयोजन केले जात आहे. निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक पक्षांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप रंगत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातच आता शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन आक्रमक झाले आहेत.

Deola | खर्डे परिसरात वीजेचा लपंडाव; केदा आहेरांसह त्रस्त शेतकऱ्यांनी गाठले उपविभागीय कार्यालय

काही दिवसांपूर्वी रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षाबाहेर सोयाबीन आणि कापसाच्या दरवाढीसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा कर्जमुक्ती, पिक विमा, सोयाबीन आणि कापूस दरवाढीच्या मागण्यांसाठी आम्ही एक राज्यव्यापी आंदोलन उभं करणार असल्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. ‘हे आंदोलन न भूतो न भविष्यती असून सत्ताधारी नेत्यांना बाहेर फिरणं मुश्किल होईल.’ अशा शब्दात माध्यमांशी बोलताना रवींद्र तुपकरांनी सरकारला इशारा दिला.

आमच्या मुंबई येथे पार पडलेल्या मागच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना हक्काचा पिक विमा मंजूर करा, सोयाबीन आणि कापसाचे दर मागील तीन वर्षांपासून पडलेले आहेत. तेव्हा दरवाढी संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करून आयात आणि निर्यात बाबत धोरण ठरवा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्या. अशी मागणी केली होती. परंतु “राज्य सरकारने मला अटक करत, आमचे ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही आमच्या कार्यकर्त्यांकडून गिरगाव चौपाटीवर आंदोलन केलं गेलं.” असा आरोप करत सरकारवर निशाणा साधला.

Pune Muk Morcha | भर पावसात शरद पवारांचे तोंडाला काळा मास्क लाऊन ‘मुक आंदोलन’

“लवकरात लवकर निर्णय घ्या नाहीतर…. “

“आम्ही राज्य सरकारला एकच सांगू इच्छितो…दोन ते चार दिवसात आमच्या मागण्यांबद्दल निर्णय घ्या. नाहीतर येत्या काळात पिक विमा, सोयाबीन आणि कापूस दरवाढीसह कर्जमुक्ती या शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता आमच्याकडून लवकरच एक राज्यव्यापी आंदोलन केले जाईल. हे आंदोलन न भूतो न भविष्यती असेल, त्याचबरोबर राज्यातील सत्ताधारी नेत्यांना बाहेर पडणे मुश्किल करणारे असेल.” असा इशारा त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला. त्याचबरोबर “पक्ष जात धर्म बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकत्र या. आपण जातीसाठी एकत्र येऊ शकतो तर मग मातीसाठी एकत्र आलं पाहिजेे.” असं म्हणत रविकांत तुपकरांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवाहन केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here