Deola | देवळा तालुक्यातील अठरा वर्ष पूर्ण झालेल्या बहुसंख्य नागरिकांनी अद्यापही आधार कार्ड काढलेले नसल्याने त्यांना तालुक्यात इतर आधार सेंटरवर आधार कार्ड काढून मिळत नाही. त्यामुळे त्यांना इतरत्र जावे लागत असून अशा नागरिकांसाठी देवळा येथे आधार सेंटर सुरू करावे अशी मागणी खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच वैभव पवार यांनी देवळा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, नव्या नियमानुसार अठरा वर्ष पूर्ण झालेल्या ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत आधार कार्ड काढलेले नाही. त्यांना विशिष्ट आधार सेंटरमध्येच नवीन आधार कार्ड काढता येते. देवळा तालुक्यात अठरा वर्षाच्या पुढील नागरिक ज्यांच्याकडे अद्याप आधार कार्ड नाही अशांचे देखील प्रमाण मोठे आहे. देवळा तालुक्यातील कार्यरत आधार सेंटरवर १८ वर्षाच्या पुढे वय झाल्याने नवीन आधार कार्ड काढून मिळत नसल्याने त्यांना विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.
Deola | वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारावर शेतकऱ्यांची नाराजी; शेतकऱ्यांकडून उपोषणाचा इशारा
शासनाच्या योजना अथवा इतर कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. देवळा तालुक्यात १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना नवीन आधार कार्ड काढण्यासाठी सेंटर उपलब्ध नसल्याने त्यांना नवीन आधार कार्ड काढणेसाठी नाशिक अथवा इतरत्र ठिकाणी जावे लागत आहे. यामुळे त्यांचे मानसिक त्रासाबरोबरच आर्थिक त्रासदेखील होत आहे. यामध्ये महीला तसेच वृद्धांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही. तरी अद्यापपर्यंत अठरा वर्षाच्या पुढील ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढलेले नाही त्यांच्यासाठी तात्काळ देवळा येथे आधार सेंटर सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी शेवटी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम