Shantata Rally | नाशिक : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यभरात शांतता जनजागृती रॅलीचे (Shantata Rally) आयोजन केले होते. आज ही शांतता रॅली नाशिकमध्ये दाखल होणार असून, नाशिकमध्ये आज मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा समारोपही होणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या नाशिकमधील रॅलीच्या पार्श्वभूमीवर मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या (Chhagan Bhujbal) निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
राज्यात सध्या मराठा ओबीसी वाद चांगलाच तापलेला असून, मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातही टिका युद्ध सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागणीला ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी समाजाचा विरोध आहे. यामुळे मनोज जरांगेंच्या नाशिकमधील शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष काळजी आणि सतर्कता बाळगण्यात येत आहे.
Maratha Rally | मराठ्यांचं ‘भगवं वादळ’ उद्या नाशकात धडकणार; असा आहे रॅलीचा मार्ग
मोठा फौजफाटा, घराजवळील रस्त्यांवरही बॅरिकेटिंग
छगन भुजबळ यांचे निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्म बाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. दोन अधिकारी आणि 20 पेक्षा अधिक अंमलदार हे भुजबळ फार्म बाहेर तैनात करण्यात आले आहे. एवढेच नाहीतर भुजबळ फार्मभोवती आणि घराभोवती जाणाऱ्या रस्त्यांवरही बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी पोलिसांनी घतेली आहे.
Chhagan Bhujbal | भुजबळ कोणाच्या इशार्याने बोलतात; विरोधकांकडून भुजबळांच्या नार्को टेस्टची मागणी
Shantata Rally | मनोज जरागेंच्या रॅलीचा मार्ग
सकाळी ११ वाजता तपोवन येथे मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होईल. जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत होईल आणि शांतता रॅलीची सुरुवात होईल. तपोवन पासून जुना आडगाव नाका – निमाणी मालेगाव स्टॅण्डमार्गे ही रॅली मार्गक्रमण होईल. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूतळ्याला पुष्पहार अर्पण करून पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत सत्कार होईल.
त्यानंतर रविवार कारंजा, मेहेर सिग्नल मार्गे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मनोज जरांगे पाटील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर सीबीएस चौकात उपस्थित सकल मराठा समाज बांधवांना मनोज जरांगे पाटील संबोधित करतील आणि याठिकाणी शांतता रॅलीचा समारोप होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम