देवळा | रासायनिक खतांमुळे जमिनीची पोत दिवसेंदिवस खालवत असल्याने पिकांवर देखील याचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी जैविक खते व जैविक कीटकनाशके वापरल्यास आधुनिक शेतीसाठी ते वरदान ठरेल, असे प्रतिपादन कृषी तज्ञ रामदास पाटील यांनी येथे केले. देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कृषी मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन रामदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पाटील यांनी विद्यार्थ्यांना शेतीविषयी माहिती सांगितली, जैविक खते व जैविक कीटकनाशके याविषयी सखोल मार्गदर्शन करून त्याचे महत्व पटवून सांगितले. जैविक खते व जैविक कीटकनाशके हे पर्यावरण पूरक, प्रदूषणमुक्त, परिणामकारक, जमिनीची पोत, सुपीकता, उत्पादनात भरमसाठ वाढ होण्यास मदत होते. अनेक वर्षापासून पाटील हे शेतकऱ्यांमध्ये जैविक खते व जैविक कीटकनाशके याविषयी जागरूकता निर्माण करत आहेत. रासायनिक खतांपासून होणारे दुषपरिणाम या विषयी माहिती देत आहेत.
Deola | देवळा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची तालुका कार्यकारणी जाहीर
त्यांच्या प्रयोगशाळेत निळे हिरवे शेवाळ, रायझोबियम, ऍसिटोबॅक्टर, ऍझोटोबॅक्टर, ट्रायकोडर्मा, बुरशी इत्यादीपासून जैविक खते तयार केले जातात. रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशकामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. जमीन नापीक होते. प्रदूषण होते इत्यादी परिणामाला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जैविक घटकांचा वापर आपल्या शेतीमध्ये वाढवावा असे सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर होते. डॉ. डी. एम. सुरवसे (समन्वयक कृषी मार्गदर्शन केंद्र) यांनी कार्यक्रमाचा उद्देश व पाहुण्यांचे स्वागत व परिचयकरून दिला. डॉ. वि. के. वाहुळे यांनी आभार मानले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. जयवंत भदाणे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम