सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | विठेवाडी (ता.देवळा) येथील व सध्या नागपुरात राहत असलेल्या उन्नती योगेश निकम या शालेय विद्यार्थीने कराटे क्रीडा प्रकारात पाच देशांच्या स्पर्धेत मलेशियाच्या स्पर्धकास पराभूत करून सुवर्णपदक पटकावले असून, २०२५ मध्ये उत्तराखंड येथे होणाऱ्या ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तीची निवड झाल्याने विठेवाडीत मंगळवारी (दि.१४) रोजी कु. उन्नती हीचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन कुबेर जाधव, व्हा. चेअरमन कैलास कोकरे, पी. डी निकम, महिंद्र आहेर, बाळासाहेब सोनवणे, वसंतराव निकम, संजय सावळे, शशिकांत निकम, समाधान निकम, जिभाऊ कोकरे, तानाजी निकम, अभिजीत निकम, दौलत निकम, मोठाभाऊ निकम, बबलू निकम, राहुल निकम, सचिव संजय निकम, सुभाष पगार, योगेश निकम आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम