Ladki Bahin Yojana | लाडकी बहीणच्या भरघोस यशानंतर आता राज्य सरकारची ‘लाडकी मोलकरीण’ योजना..?

0
97
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

Maharashtra News :  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पावसाळी अधिवेशनात (Budget 2024)  महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) गेमचेंजर डाव टाकला असून, या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेऊन सरकारने ही योजना सुरू केली असून, यावरून सध्या राज्यात आरोप प्रत्यारोपांचे युद्ध सुरू आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या भरघोस यशानंतर आता सरकार असंघटित क्षेत्रातील मोलकरणींना गृहोपयोगी साहित्य वाटप करण्याच्या तयारीत आहे. संदर्भातील एका योजनेवर सध्या सरकारचे काम सुरू असून, दैनिक लोकसत्ताने याबाबत माहिती दिली आहे. राज्यात तब्बल 10 ते 12 लाख घरगुती मोलकरणींची संख्या आहे, अशी माहितीही सरकारकडून जारी करण्यात आली आहे.

Ladki bahin yojana | लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढणार..?; बघा काय म्हणाले अजित पवार

Ladki Bahin Yojana | योजने अंतर्गत मोलकरणींना काय मिळणार..? 

राज्य सरकारच्या या योजने अंतर्गत मोलकरणींना 10 हजार रुपयांचा स्वयंपाक घरातील भांड्यांचा संच मिळणार असून, यात कुकरसह 21 भांडे देणार असल्याची माहिती आहे. मात्र, या भांड्यांच्या संच हे केवळ नोंदणीधारक घरगुती मोलकरणींनाच मिळणार आहे.

मोलकरीण म्हणून नोंदणी करण्यासाठी महिलांची झुंबड 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये याबाबत काही अफवा पसरल्यानंतर महिलांची एकच गर्दी उसळल्याचाही प्रकार समोर आला होता. त्यानंतर मोलकरीण म्हणून नोंदणी करण्यासाठीही महिलांची एकच झुंबड उडाली. एका वृत्तपत्रातील माहितीनुसार, बांधकाम कामगारांसाठीची भोजन योजना, कामगारांना कामावरील साहित्य संच वाटप योजनेच्या धर्तीवरच आता अधिकृत नोंदणी असलेल्या घरेलू कामगार व मोलकरणींसाठी 10 हजार रुपये कींमतीच्या भांड्यांचा संच देण्यात येणार आहे. राज्यात आता तब्बल 12 ते 13 लाख घरेलू कामगार असून, यापैकी 99 टक्के या महिला आहेत. मात्र यात नोंदणीकृत कामगारांची संख्या फार कमी आहे.

Ladki Bahin Yojana | गट-तट विसरून कार्यकर्त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या राबवण्यासाठी सक्रिय व्हावे – आ. आहेर


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here