Ramdas Athawale : राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, यापेक्षाही जास्त महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री कोण असणार..? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. महायुती आणि मविआ दोन्ही गटांकडून आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही. अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे घेतली जात असून, सर्वच नेत्यांचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर लावले जात आहे.
दरम्यान, यातच आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं असून, त्यांनी थेट मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. नुकतीच उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत भाजप आणि फडणवीसांवर टिका करताना “एकतर देवेंद्र फडणवीस राहतील नाहीतर मी राहील” असं वक्तव्य केलं होतं. यावर रामदास आठवले यांनी दोघांना एकत्र येण्याचा सल्ला दिला आहे.
मशिदीवरील भोंगे काढल्यास आरपीआयचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देणार – आठवले
Ramdas Athawale | ठाकरे फडणवीसांची पुन्हा मैत्री व्हावी
उद्धव ठाकरे म्हणाले की ‘एक तर ते राहतील किंवा फडणवीस राहतील’. पण दोघंही माझे मित्र आहेत. माझी दोघांनाही विनंती आहे की दोघांनीही राजकारणात राहायला हवं. एकनाथ शिंदे स्वतः नाराज असल्यामुळे ते बाहेर पडले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोडलं नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री बनण्याऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असतं तर ते कदाचित बाहेर पडले नसते. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांबद्दलचा राग काढून टाकायला हवा. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघे चांगले मित्र होते. आणि त्यांची पुन्हा मैत्री व्हावी, अशी आमची इच्छा आहे”, असं रामदास आठवले म्हणाले. (Ramdas Athawale)
लाऊडस्पीकरच्या वादात रामदास आठवलेंची उडी, म्हणाले- मशिदीतून काढले तर…
तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच
राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार..? असा प्रश्न रामदास आठवले यांना विचारला असता, ते म्हणाले की, “जर उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यातील हा वाद न मिटल्यास महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच आहे”, असं सूचक वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम