नाशिक : पुणे येथे कार्यरत असलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) प्रकरण हे राज्यभरात गाजत असतानाच आता नाशिक जिल्हा परिषदेतही असे काही फसवे अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्र हे खोटे असून, त्यांच्याबाबत आणखी काही बाबी उघडकीस आल्याने खेडकर यांनी यूपीएससीची फसवणूक केल्याचे दावे केले जात आहेत. दरम्यान, नाशिक जिल्हा परिषदेतही (Nashik Zilla Parishad) विविध विभागातील तब्बल 59 अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी भरती झाल्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र अर्थात युडीआयडी कार्ड (UDID Card) सादर केले नसल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.
Nashik Zilla Parishad | जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा..?
नोटिस बजावल्याननंतर गेल्या महिनाभरात केवळ नऊ कर्मचाऱ्यांनी युडीआयडी नंबर सादर केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदमधील सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग, शिक्षक व महिला व बालविकास या विभागातील 59 कर्मचारी हे आता जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आहेत. तर, यात दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केलेले सर्वाधिक संशयास्पद कर्मचारी हे शिक्षण विभागात असल्याची माहिती आहे.(Nashik Zilla Parishad)
Nashik Zilla Parishad | नाशिक जिल्हा परिषदेचा कारवाईचा धडाका; तिघांचे निलंबन, आठ जणांवर कारवाई
नेमकं प्रकरण काय..?
दिव्यांग प्रमाणपत्राबाबतचे समोर येत असलेले प्रकरणं पाहता आणि याबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता बदलीसाठी सदर कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबतचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Nashik Zilla Parishad CEO Ashima Mittal) यांच्याकडून मार्चमध्ये घेण्यात आला होता.
प्रशासनाची कारवाईची तयारी..?
यानुसार जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिव्यांग पडताळणी क्रमांक (युडीआयडी क्रमांक) सादर करण्यासाठी 198 कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यापैकी मुदतवाढ देऊनही 59 कर्मचाऱ्यांनी अद्याप दिव्यांग पडताळणी क्रमांक (युडीआयडी क्रमांक) काढलेला किंवा सादर केलेला नाही. दरम्यान, अखेर जिल्हा प्रशासनाने या संशयास्पद कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून, त्यांचे दिव्यांगांचे सर्व लाभ व सवलती रद्द करण्याची तयारी केली आहे. (Nashik Zilla Parishad)
Swine Flu | स्वाईन फ्लूमुळे नाशिककरांची चिंता वाढली; आतापर्यंत इतक्या रुग्णांना मृत्यु..?
दीड महिन्यांपासून टाळाटाळ..?
पडताळणी करणे बाकी असणाऱ्या 198 कर्मचाऱ्यांनी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी केवळ 11 कर्मचाऱ्यांनी तेव्हा पडताळणी पूर्ण केली. यानंतर उरलेल्या 187 कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात पडताळणीसाठी अर्ज केल्याचे सांगत 25 एप्रिलपर्यंत पडताळणी केली नव्हती. त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
यानंतर दीड महिन्यानंतर 187 पैकी 109 कर्मचाऱ्यांनी पडताळणी केली आणि यूडीआयडी क्रमांक काढला असून, अद्यापही 59 कर्मचाऱ्यांची पडताळणी बाकी आहे आणि त्यांनी यूडीआयडी क्रमांक काढलेला नसल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार..? हे पहावे लागणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम