Deola | विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी एसकेडी स्कूलची आठवडे बाजाराला भेट

0
69
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, या उद्देशाने देवळा येथील एसकेडी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने देवळा येथील आठवडे बाजाराला भेट देऊन विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देण्यात आले. सीबीएससी द्वारा राबाविण्यात आलेल्या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी अधिकाधीक विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व मुलांना जीवनात उपयोगी असे व्यावहारिक ज्ञानविषयी माहिती मिळाली. वस्तूंची खरेदी विक्री याविषयी त्यांना शिकवले गेले.

Deola | व्हीकेडी स्कूलमध्ये शिक्षण सप्ताहाचे आयोजन

अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दलची गोडी वाढली. शाळेचे हे कार्य त्यांच्या उक्ती ‘विद्या धनम सर्व धनम प्रधानम’ याला शोभेसे आहे. मुलांना गणिताचा आयुष्यात होणारा खरा उपयोग समजला व अशाप्रकारे हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला. यात शाळेचे प्राचार्य सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विभाग प्रमुख अनुजा सोनवणे, शिक्षिका रुपाली पवार, माधुरी दराडे व प्रियांका जावडा यावेळी उपस्थित होत्या व त्यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. या उपक्रमास संस्थेचे चेअरमन संजय देवरे, सचिव मीना देवरे यांनी शुभेच्छा दिल्या.

Deola | एसकेडी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘टीएलम दिवस’ साजरा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here