Ladki bahin yojana | मुख्यमंत्र्यांची पंढरपुरातून मोठी घोषणा; लाडक्या भावांना देणार इतकी रक्कम

0
90
Ladki bahin yojana
Ladki bahin yojana

सोलापूर :  राज्यात आज आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, पहाटेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. पंढरपुरात आज वैष्णवांचा मेळा भरला असून, राज्यभरात भक्तिमय वातावरण आहे. कालपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब हे पंढरपुरात (Pandharpur) दाखल झाले असून, विविध कार्यक्रमांना ते स्वतः हजेरी लावत आहेत. दरम्यान, काल पंढरपुरात आयोजित कृषी पंढरी 2024 या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी एक मोठी घोषणाही केली.

यावेळी त्यांनी उशीरा येण्याचे कारण उपस्थितांना सांगत पांडुरंगाच्या जयजयकाराने त्यांनी भाषणाला सुरुवात केली. “जय जय राम कृष्ण हरी, बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव…तुकाराम…पंढरीनाथ महाराज की जय” असा जयजयकार करत ते म्हणाले. काल रात्री पंढरपूरच्या (Pandharpur) वारीसाठी येणाऱ्या बसचा अपघात झाला. मी त्याठिकाणी डोंबिवलीत जाऊन या अपघातातील जखमींची भेट घेतली. तसेच, तेथील डॉक्टरांनाही सूचना केल्याचं मुख्यमंत्री एकणा शिंदे म्हणाले. त्यानंतर, लाडकी बहीण योजनेची (Ladki bahin yojana) माहिती देत लाडक्या भावांसाठीही योजना आणल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेची माहिती दिली. या अंतर्गत लवकरच माझ्या बहि‍णींच्या खात्यात 1500 रुपये प्रमाणे दर महिन्याला पैसे जमा होतील. मात्र, काही लोक म्हणतात लाडक्या बहिणींचं झालं, पण आता लाडक्या भावांचं काय? त्यामुळे त्यांच्यासाठीही आम्ही योजना सुरू केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून जाहीर केले. (Ladki bahin yojana)

Ladki bahin yojana | लाडकी बहीण योजनेबाबत ‘या’ अफवा; नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

Ladki bahin yojana | बारावी पास झालेल्यांना 6 हजार रुपये देणार 

या योजने अंतर्गत, राज्यातील बारावी पास झालेल्यांना 6 हजार, डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार व डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये महिन्याला स्टायफंड देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भाषणातून केली. त्यामध्ये वर्षभर तो भाऊ कंपनीत काम करेल आणि त्याला अप्रेंटीस म्हणून ही रक्कम सरकारकडून देण्यात येणार आहे.

वर्षभर त्या कंपनीत तो ट्र्रेन होईल आणि त्याच्या अप्रेंटीशीपचे पैसे राज्य सरकार भरणार असून, इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना आम्ही सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उद्योग, कारखाने व कंपन्यांमध्ये हे तरुण ॲप्रेंटिशीप करतील व त्यांना दर महिन्याला भत्ता सरकारकडून देण्यात येईल. तसेच, मुलींसाठी 100 टक्के मोफत उच्च शिक्षणाची सोय आपण केली असून, राज्यातील शेतकऱ्यांसाठीही आमच्या सरकारने विविध योजना आणल्या असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Ladki bahin yojana)

Ladki Bahin Yojana | ‘१५०० घ्या पण, गद्दार म्हणू नका’; नाशकात पत्रक छापत ‘लाडकी बहीण’ योजनेवर टिका


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here