Ladki Bahin Yojana | ‘१५०० घ्या पण, गद्दार म्हणू नका’; नाशकात पत्रक छापत ‘लाडकी बहीण’ योजनेवर टिका

0
106
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

नाशिक : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची घोषणा केली. त्यानंतर १ जुलैपासून या योजनेसाठी नोंदणी सुरू झाली असून, अनेक ठिकाणी तहसील कार्यालयांमध्ये आणि सेतु कार्यालयांवर महिलांची एकच झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले. या योजने अंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना १५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana | नेमकं प्रकरण काय..?

दरम्यान, यावरून आता नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Camp ) अजब पत्रकं छापत राज्य सरकारवर टिका केली आहे. “१५०० रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका”, असा आशय या पत्रकांवर छापण्यात आला असून, ही पत्रकांची आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. तर, या पत्रकांद्वारे ठाकरे गटाकडून महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेवर उपरोधिक टीका करण्यात आली आहे. (Ladki Bahin Yojana)

नाशिकमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा दराडे यांनी हे पत्रक छापले असून, त्यात महिलांना या योजनेची माहिती देणारे हे पत्रक आहे आणि या पत्रकावर एक मजकूर छापून लाडकी बहीण योजनेवर एकप्रकारे टीका करण्यात आली आहे. तर, “या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक ठिकाणी महिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे. आमच्या प्रभागातदेखील मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग असल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देत सरकारवर टीका करणार, असल्याची भूमिका ठाकरे गटाचे बाळा दराडे यांनी व्यक्त केली. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana | ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार..?; वाच सविस्तर माहिती

१५०० रुपये देतो, पण आम्हाला गद्दार म्हणू नका

“या विद्यमान महायुती सरकारचे आयुष्य हे आता केवळ दोन-तीन महिने राहिले आहे. त्यामुळे जर गरीब महिलांना १५०० रुपये मिळत असतील. तर त्यांना त्या १५०० रुपयांपासून का वंचित ठेवायचे..? या सरकारने सामान्य जनतेचा पैसा लुटण्याचे काम केले आहे आणि तोच पैसा वेगवेगळ्या माध्यमातून ते आता जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. हे सरकार गद्दारी करून जन्माला आले असल्याने राज्यात या सरकारची मोठी बदनामी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने या सरकारला धूळ चारली आहे. विधानसभेतही हे सरकार आता पायउतार होणार असल्याची त्यांना जाणीव झाल्याने “१५०० रुपये देतो, पण आम्हाला गद्दार म्हणू नका”, अशी योजना त्यांनी काढलेली आहे.

Nashik Citilink | नाशिकची लाईफलाइन बंद पडण्याच्या मार्गावर; नेमकं प्रकरण काय..?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here