Ashadhi Ekadashi 2024 | नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्याला मानाच्या वारकऱ्याचा मान; मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे

0
122
Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024

पंढरपूर :  आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक शासकीय महापूजा पार पाडली. मध्यरात्रीच ही महापूजा झाली असून, यावेळी मानाच्या वारकऱ्याचा मान हा नाशिक जिल्ह्यातील अहिरे दाम्पत्याला मिळाला.

मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे 

मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच पत्नी लता शिंदे यांच्यासह पंढरपुरात विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी राज्यातील बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे आणि आपलं राज्य हे सुजलाम सुफलाम होऊ दे, यंदा चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सुगीचे आणि चांगले दिवस येऊ देत, असं साकडं त्यांनी घातलं.

Igatpuri | माणिकखांब येथील प्रति पंढरपूरात आषाढी एकादशीला भरणार भक्तीचा मेळा

सटाणा तालुक्यातील दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी 

या आषाढी एकादशीच्या महापूजेला मुख्यमंत्र्यांसोबत आषाढी एकाशीची शासकीय महापूजा (Ashadhi Ekadashi Shasakiya Mahapooja) हहि नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अहिरे दाम्पत्याने केली. सटाणा तालुक्यातील अहिरे दाम्पत्य हे मगील 16 वर्षांपासून वारी (Pandharpur Vari) करत असून, बाळू शंकर अहिरे व त्यांच्या पत्नी आशाबाई बाळू अहिरे यांना मानाच्या वारकऱ्याचा मान मिळाला आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली.

Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन; रॅली सोडून धावले चिमूकल्याच्या मदतीला 

Ashadhi Ekadashi 2024 | 16 वर्षांपासून आहीरे दाम्पत्य करताय वारी 

यावेळी “माझ्या आई-वडिलांची पुण्याई होती. म्हणूनच पांडुरंगाच्या या शासकीय महापूजेचा मान आम्हाला मिळाला. कित्येक तास रांगेत उभा होतो आणि त्यानंतर आम्हाला मान मिळाला. आजच्या या पूजेचा मान मिळणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो. गेल्या 16 वर्षांपासून आम्ही  नित्यनियमानं वारी करत” असल्याची भावना आहीरे दाम्पत्याने यावेळी व्यक्त केली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here