नाशिक प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे सुरू आहे. या संमेलनाचा समारोप खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होत असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी कुसुमाग्रजनगरीला भेट देत पाहणी केली.
यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, खासदार श्रीनिवास पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, नंदकुमार डागा, कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, प्राचार्य प्रशांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संमेलन स्थळी खासदार शरदचंद्र पवार यांनी संमेलनस्थळी उभारण्यात आलेल्या विविध पुस्तकांच्या स्टॉल ला भेट दिली.
यावेळेस वेगवेगळ्या स्टॉल धारकांनी पवारांना पुस्तके भेट स्वरूपात दिलेत. तसेच चित्रदालन, बालकवी कट्टा, कवी कट्टा, गझल कट्टा व मुख्य सभामंडप परिसराची पाहणी केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम