वैभव पगार – प्रतिनिधी : दिंडोरी | वंचित बहुजन आघाडी तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्रच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म परळी शहरातील वार्ड क्रमांक तीन व चार मधील महिलासाठी मोफत वाटप करण्यात येणार असून याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले असल्याची माहिती तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे.
नुकत्याच पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने महिलांसाठी विशेष अशी योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना जाहीर करून महिलांना सक्षम करून एक प्रकारे दिलासा देण्याचे काम केले असून, यासाठी एक जुलै पासून ही योजना लागू करण्यात आली आहे. याचे फॉर्म भरण्याचे काम ही चालू केले असून ते फॉर्म वंचित बहुजन आघाडी तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्रच्या वतीने परळी शहरातील वार्ड क्रमांक तीन व चार मधील महिलांना दिनांक पाच सात 2024 पासून मोफत देण्यात येणार आहे.
यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, बँकेचे पासबुक व दोन पासपोर्ट आकाराचे फोटो घेऊन वार्ड क्रमांक तीन व चार मधील जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा व हा फॉर्म मोफत घेऊन जावा असेही आव्हान तक्षशील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्राचे संपादक वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी केले असून 9689847111/9112311777 या नंबरची संपर्क साधावा असेही आव्हान करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम