सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील आहेर महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. डी. के. आहेर व प्राथमिक शिक्षिका ज्योती सोनवणे- आहेर यांचा मुलगा प्रितिश आहेर याने पहिल्याच प्रयत्नात आयबीपीएसमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून सिक्क्युरीटी प्रिंटींग अँड मिंटींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (वित्त मंत्रालय) मध्ये सहाय्यक व्यवस्थापक वर्ग एक पदाला गवसणी घातली. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रितीशचे प्राथमिक शिक्षण सटाणा येथील काकडे गुरुजी व माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात झाले. बारावीनंतर सिंहगड कॉलेज, पुणे येथे इंजिनिअरिंग (मॅकेनिकल) शाखेतून प्रवेश घेत बीईची पदवी मिळवल्यानंतर प्रितिशने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेकडे आपले लक्ष केंद्रित केले.सुरवातीला मोटार वाहन निरीक्षक परीक्षेत यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.
Deola | खडकतळे शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
मात्र रचनात्मक, सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी, मेहनत अवलंबवत अभ्यास केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा सोबततच बँकिंगच्या विविध परीक्षा देत यश मिळवले. सुरवातीला खाजगी बँकांमध्ये संधी आली. मात्र शासकीय सेवेला प्राधान्य म्हणून सेन्ट्रल बँक ऑफ इंडियात असिस्टंट मँनेजर म्हणून दोन महिने काम केले. लगेचच मागील वर्षी करन्सी नोट प्रेस नाशिक येथे पर्यवेक्षक यांत्रिकी अभियंता पदी निवड झाली. मागील आठ महिन्यापासून ते या पदावर कार्यरत आहेत. एवढ्यावरच समाधान न मानता त्यांनी स्वयं अध्यनाबरोबरच अभ्यासात सातत्य ठेवले.
आयबीपीएसमार्फत घेण्यात आलेल्या सिक्क्युरीटी प्रिंटींग अँड मिंटींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (वित्त मंत्रालय) मध्ये सहाय्यक व्यवस्थापक कार्यकारी वर्ग एक पद संपादित करत यशाला गवसणी घातली. त्यांच्या या यशाबद्दल देवळा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी, डॉ. व्ही. एम. निकम, मविप्र संचालक विजय पगार, योगेश आबा आहेर, डॉ. मालती आहेर,आजी ताईबाई आहेर, डॉ. सतिश ठाकरे, प्रा. रविंद्र शिरसाठ, दिनकर आहेर, फुला सूर्यवंशी, कसमा पतसंस्थेचे माजी चेअरमन अरुण पवार, सीए स्वप्निल चव्हाण, पत्नी तनुजा आहेर आदींनी अभिनंदन केले.
Deola | खर्डे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी अनिल रामदास देवरे बिनविरोध
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम