Deola | सुधारित कायद्यांबाबत जनतेला माहिती होण्यासाठी जनजागृती महत्त्वाची – पो. नि. दिपक पाटील

0
21
Deola
Deola

सोमनाथ जगताप – पतिनिधी : देवळा |  केंद्र सरकारने 1 जुलै 2024 पासून फौजदारी कायदे सुधारित केले असून, त्यात तीन फौजदारी कायदे लागू केले आहेत. उदा – भारतीय न्याय संहिता 2023 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय सक्षम अधिनियम 2023 या सुधारीत कायद्यांची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून लागू होणार असून, ह्या संदर्भात जनजागृती व्हावी असे देवळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी आज रविवारी (दि 30) रोजी बैठकीत सांगितले.

Deola | प्रितिश आहेर यांची सिक्युरीटी प्रिंटींग अँड मिंटींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदी निवड

यावेळी त्यांनी भारतीय न्याय संहिता 2023कलम 106(2) वगळता 1 – 7-2024 पासून प्रभावी, भारतीय साक्ष अधिनियम 2023 1- 7- 2024 पासून, प्रभावित भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 पहिल्या अनुसूचीमधील भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 106(2) संबंधित नोंदी मधील तरतुदी वगळता 1-7- 2024 पासून लागू होतील. याबाबत अधिकृत माहिती प्रसार माध्यमातून येणारच आहे. परंतु जनतेस याची सविस्तर माहिती होण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे असे त्यांनी तालुक्यातील पत्रकार, जेष्ठ नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन सांगितले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here