Igatpuri | बियाणे, खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रात गर्दी

0
42
Igatpuri
Igatpuri

राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | साकुरफाटा येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सर्व कृषी सेवा केंद्रात विविध प्रकारचे भाताचे वाण उपलब्ध आहेत. यासह शासकीय दराने शेतकऱ्याना योग्य प्रतीचे भात बियाणे, रासायनिक खतांचा पुरेसा खत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. साकुर फाट्यावरील सर्व कृषी सेवा केंद्रात विविध प्रकारचे बी बियाणे घेण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत. सुंदर एन पी १२५, डी १००८, रुपम, ओमसाई, कर्नाटका इंद्रायणी, श्री १०१, अन्नपूर्णा, अर्व १४ असे भाताचे वाण उपलब्ध असल्याचे दारणा ॲग्रोचे संचालक दत्ताशेठ सहाणे यांनी सांगितले.

Igatpuri | अनिता नलगे फौंडेशनच्या वतीने टाकेद येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कॉट, मेट्रेस वाटप

गजीराम वाकचौरे, कैलास देवकर, संजय गायकवाड, गोकुळ गायकवाड या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे बी बियाणे देण्यात आली. शेतकरी नेते नारायणराजे भोसले ओंकार ॲग्रोटेकचे गणेश शेळके, बालाजी ॲग्रो अतुल गोसावी, वैभव ॲग्रो बाळासाहेब जाधव, भोसले ॲग्रो अक्षय भोसले, सप्तश्रृंगी कृषी राधकिसन झनकर, त्र्यंबकराज कृषी लक्ष्मण गोडसे, नीरज ॲग्रो विलास भगत, गजानन कृषी आदित्य परदेशी, पूजा सिड्स रोहिदास फोकणे, शेतकरी कृषी मयूर सहाणे, समृद्धी कृषी भरत झनकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना खते बियाणे कीटकनाशके यांची अडचण, तक्रारीबाबत तालुकास्तरावर भरारी पथक स्थापन असून त्यामध्ये कृषी अधिकारी, पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी, वजन मापे निरीक्षक सहभागी आहे. शेतकरी बांधवांना खते बियाणे, कीटकनाशके खरेदी करण्याबाबत अथवा या संबंधात इतर काही तक्रारी असल्यास तात्काळ कृषी अधिकारी पंचायत समिती अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तात्काळ संपर्क साधावा असे पंचायत समितीचे कृषि अधिकारी भदाणे यांनी सांगितले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here