सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेत देवळा येथील आहेर महाविद्यालयाच्या महाविद्यालयाच्या ‘बांधिलकी’ या नियतकालिकांस वर्ष 2021-22 चे विद्यापीठस्तरीय प्रथम पारितोषिक तर वर्ष 2022-23 चे जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या इतर सदस्यांसमवेत प्रदान करून गौरवण्यात आले. पुरस्कार प्राप्त ‘बांधिलकी’ या कोरोना विशेषांकात आणि स्वातंत्र्य- 75 या नियतकालिकात विद्यार्थ्यांचे अनुक्रमे कोरोनाचा विविध समाजघटकांवर आणि उद्योग-व्यवसायावर झालेला परिणाम यावर प्रत्यक्ष मत मांडणारे लेख आहेत.
Deola | नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत देवळ्यातील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने..?
तर स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षातील घटनांची नोंद विद्यार्थ्यांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा हा प्रयोग विद्यापीठ आणि जिल्हास्तरावर रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आल्याने देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, सचिव प्रा. डॉ. मालती आहेर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. पारितोषिक स्वीकृती विद्यार्थ्यांच्या वतीने प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, महाविद्यालयाचे कुलसचिव दिनेश वाघमारे यांनी केली. बांधिलकीला यापूर्वीही दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नामवंत साहित्यिक आणि समिक्षक आणि विद्यापीठाने गौरविले आहे.
Deola | वैभव पवार उत्कृष्ट कुक्कुटपालक व्यावसायिक पुरस्काराने सन्मानित
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम