Deola | देवळा येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नाशिकमधील घटनेचा निषेध

0
18
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  पंचवटी येथील काळाराम मंदिर परिसरात राहणाऱ्या समाजकंटक प्रथमेश संदीप चव्हाण नामक मुलाने हिंदू युवा वाहिनी या संघटनेच्या लेटरहेड वर काळाराम मंदिर सत्याग्रहाला अनुसरून आंबेडकरी समाजाबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून परिसरात वाटप केल्याच्या निषेधार्थ देवळा येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनच्या वतीने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना निवेदन देण्यात आले.

Nashik Crime News | वादग्रस्त पत्रकांमुळे नाशिकमध्ये तणाव; पोलिसांच्या सजगतेने परिस्थिती नियंत्रणात

निवेदनात ह्या प्रकाराबद्दल आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून, या प्रकरणाला हिंसक वळण लागण्याआधी या प्रकरणातील समाजकंटकावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष देवळा तालुका अध्यक्ष नितीन अहिरे, आरपीआय आठवले गटाचे तालुका अध्यक्ष कैलास पवार, शांताराम पवार, नगरसेवक कैलास पवार, किरण गांगुर्डे, विकी पवार, सिद्धार्थ अहिरे, दया पवार, सुनील साबळे, पप्पू पवार, कल्पेश पवार, गणेश सोनवणे, स्वप्निल पवार, प्रतीक पवार आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here