Dhule Loksabha | या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला चांगलाच फटका बसला. भाजप प्राणित महायुतीला अनेक ठिकाणी आपल्या हक्काच्या जागा गमवाव्या लागल्या. तर, सर्वात जास्त फटका महायुतीच्या घटक पक्षांना कांदा उत्पादक पट्ट्यात बसला. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, त्याठिकाणी गेल्या दोन टर्मचे खासदार हेमंत गोडसे (hemant godse) यांचा पराभव झाला. तर, दिंडोरी हा भाजपचा बालेकिल्ला असून, येथेही केंद्रीय राज्यमंत्री राहिलेल्या भारती पवारांचा (bharti pawar) दारुण पराभव झाला. धुळ्यातही शोभा बच्छाव (shobha bachhav) यांनी गेल्या दोन टर्मचे खासदार असलेले सुभाष भामरे (subhash bhamre) यांचा पराभव करत कॉंग्रेसचा गड परत मिळवला.
Dhule Loksabha | धुळे लोकसभेची स्ट्रॅटजी
दरम्यान, धुळे लोकसभा मतदार संघात सुभाष भामरे यांचा पराभव का झाला..?. याबाबत मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “या लोकसभा निवडणुकीत आम्हाला फटका बसला कारण, मुस्लिम आणि दलित समाज हा महायुतीपासून दूर गेला होता. याचे एक उदाहरण सांगतो, धुळे लोकसभा मतदार संघांतील विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी बघितली. तर, सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात युतीचा उमेदवार हा फार पुढे आहे.(Dhule Loksabha)
मात्र, मालेगाव हा असा एकच मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभाताई बच्छाव यांना १ लाख ९६ हजार मतं पडली आणि महायुतीच्या उमेदवाराला केवळ ४ हजार मतं पडली आहेत. एकाच विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवार २ लाखाने पुढे गेल्या आणि बाकीच्या ५ मतदारसंघाचा खड्डा त्यांनी भरून काढला. म्हणजे यावरूनच कळतंय की मुस्लिम आणि दलित समाज हे विरोधात होते”, असं मंत्री छगन भुजबळ एका मुलाखतीत म्हणाले आहेत.
Dhule Lok Sabha | बाहेरच्या उमेदवार शोभा बच्छाव विजयी; भामरेंची हॅट्रिक हुकली
४०० पारच्या नाऱ्यामुळे…?
“या निवडणुकीत ४०० पारचा नारा लावला गेला. त्याचा अर्थ संविधान बदलणार असा लावला गेला आणि विरोधकांकडूनही याचा प्रचार केला गेला. त्यामुळे दलित आणि आदिवासी समाज हे घाबरले आणि तो घटकही बाजूला गेला. मराठा आंदोलनाचे (maratha aandolan) परिणाम हे केवळ मारठवाड्यातील दोन ते तीन जिल्ह्यात जाणवले. विदर्भात याचाअ परिणाम जाणवला नाही. मराठा मते गेल्यावर उमेदवार पडतात. पण अमोल कोल्हे (amol kolhe) आले ना निवडून. ते क्से निवडून आले..? असा उलटप्रश्नही यावेळी त्यांनी केला. (Dhule Loksabha)
Dhule Lok Sabha | काँग्रेसला बालेकिल्ला मिळणार की सुभाष भामरे हॅटट्रिक करणार..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम