Nashik Teachers Constituency | शिक्षक आमदार पैठणी अन् पाकीट देणारा नसावा; गुळवेंचे दराडेंवर टीकास्त्र

0
63
Nashik Teachers Constituency
Nashik Teachers Constituency

Nashik Teachers Constituency |  राज्यात लोकसभा निवणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीची धुम सुरू असून, राज्यातील ४ शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांसाठी निवणूक प्रक्रिया पार पडत आहे. तर, काल नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, या निमित्ताने नाशिकमध्ये राजकीय नाट्यमय घडामोडी घडताना दिसल्या. दरम्यान, या निवडणुकीतही महायुतीत उमेदवारीवरून खडाजंगी सुरू असून, काल ठाकरे गटाकडून संदीप गुळवे, शिंदे गटाकडून किशोर दराडे, अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार यांनी अर्ज दाखल केला. तर, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हेदेखील मैदानात आहे.

पैठणी, पाकीट देणारा नाही तर पर्मनंट नोकरी देणारा असावा 

यातच आता ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवार किशोर दराडे यांच्यावर “शिक्षक आमदार हा पैठणी, पाकीट देणारा नाही तर पर्मनंट नोकरी देणारा असावा, असे टिकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. संदीप गुळवे यांनी शुक्रवारी शिक्षक मेळावा घेतला आणि यात त्यांनी विद्यमान आमदार असलेल्या शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यावर टिका करत या मेळाव्यातून जोरदार शक्तिप्रदर्शनही केले. (Nashik Teachers Constituency)

संदीप गुळवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सिन्नर फाटा शिक्षक मेळावा घेतला. या मेळाव्यासाठी मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे आणि नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह नाशिकसह विभागातील इतर जिल्ह्यांतूनही विविध शिक्षण संस्था आणि शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Teachers Constituency Election | नाशिकच्या उमेदवारीवरून पुन्हा महायुतीत बिघाडी?; नाशकात हाय व्हॉल्टेज ड्रामा

Nashik Teachers Constituency | मविआच्या नेत्यांचा किशोर दराडेंवर हल्लाबोल 

तसेच राज्यातील राजकारणाचा चिखल झाला असला तरी निष्ठेने सर्व काही मिळते, असे यावेळी खासदार वाजे म्हणाले. या निवडणुकीत मतदार शिक्षक असतात. तरीही मते बाद होण्याचे प्रमाण जास्त असल्याबद्दल अॅड. नितीन ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. आमदार किशोर दराडे यांनी कामे मार्गी लावल्याचा आव आणून शिक्षकांची दिशाभूल केल्याचा आरोप प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी नाव न घेता केला. तब्बल दोनशे कोटींची बिले वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवली आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यासाठी निधी मिळवला. मग ही बिले कोणाच्या आशीर्वादाने प्रलंबित ठेवली गेली..? असा प्रश्न शिक्षक सेनेचे संजय चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला. तर, पैठणी, पाकीट नको तर शिक्षकांची फरपट थांबवा. शिक्षण क्षेत्राचे खासगीकरण रोखले पाहिजे, असे काँग्रसच्या हेमलता पाटील म्हणाल्या. (Nashik Teachers Constituency)

Nashik News | आत आजी माजी खासदारांची ‘गळाभेट’; बाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here