Manusmriti | समता परिषदेच्या वतीने नाशकात मनुस्मृतीचे दहन

0
25
Manusmriti
Manusmriti

Manusmriti | नाशिक :   मनुस्मृतीच्या (Manusmriti) श्लोकांचा शालेय शिक्षणात समावेश करण्याबाबत शिक्षण विभागाने आराखडा तयार केला आहे. याला विरोध करण्यासाठी आज नाशिक (Nashik) येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवत नाशिक शहरातील शालिमार चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने घोषणाबाजी करत शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापुरुषांचे फलक झळकवत महापुरुषांचे विचार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्यात यावे मनुस्मृतीचे नव्हे असे आवाहन केले.(Manusmriti)

Chhagan Bhujbal | ‘भुजबळसाहेब काय चुकीचे बोलले.?’; उदयकुमार आहेरांचा राणेंवर पलटवार

यावेळी शहराध्यक्ष कविता कर्डक, महिला जिल्हाध्यक्षा पुजा आहेर, महिला शहराध्यक्षा आशाताई भंदुरे, जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, नाना पवार, अमोल नाईक, श्रीराम मंडळ, संतोष भुजबळ, किशोर गरड, जयेश सैंदाणे, हरीष महाजन, रामा गायकवाड, अजय बागुल, सुरेश शिंदे, सचिन जगझाप, धनंजय थोरात, नाना साबळे, सागर मरवट, विलास वाघ, किरण भावसार, गोरख चहाळ, जिभाऊ आहीरे, माहेन तांबे, भारत जाधव, विशाल तांबे, मच्छिंद्र माळी, शरद मंडलिक, समाधान तिवडे, बबन जगताप, पोपटराव जेजुरकर, नाना शिंदे, विकी शिंदे, नितीन चंद्रमोरे, प्रकाश महाजन, मुकेश झनके, अमित भोसले, जुनेद शेख, संगिता हांडगे, वैशाली भांगरे, गिता पवार, मंगला मोकळ, सुनिता जाधव, रंजना कुंदे, संगिता जाधव, अनिता पवार, निर्मला सावंत, माधुरी एखंडे, रंजना गांगुर्ड, रुपाली पठारे, सुजाता खैरनार, निशा झनके, संगिता विचारे, वंदना आहीरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Chhagan Bhujbal | मनुस्मृती शाळांमध्ये शिकवू देणार नाही; भाजपला त्यांच्या शब्दाची आठवण करून द्या


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here