Nashik News | नाशिकमध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, यातच आता नाशिकमधून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन महिन्यांच्या मुलीची पाच लाखांत विक्री करणारी नाशिकची एक महिला, दोन एजंट आणि मुंब्रा येथून ९ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे केवळ दोन महिन्यांपूर्वीच या मुलीचा जन्म झाला होता. मुलीच्या आईने एजंटमार्फत मुलीची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले.(Nashik News)
Nashik News | नेमकं प्रकरण काय..?
अधिक माहितीनुसार, ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला गेल्या पंधरा दिवसांपूर्वी याबाबत माहिती मिळाली होती की, मुंब्रा येथील संशयित आरोपी सहिदा, साहिल व इतर 9 सहकारी हे ८४ दिवसांच्या मुलीची विक्री करणार आहेत. दरम्यान, या पथकाने बनावट ग्राहक पाठवून लंगडा नामक एका व्यक्तीला या टोळीतील संबंधित एजंटला फोन करायला सांगितले. यावेळी मुलीची नाशिकमधून पाच लाखात विक्री करण्याची तयारी दर्शविली गेली.(Nashik News)
बाळाची आईही ताब्यात
या मुलीला (दि. २९ फेब्रुवारी) रोजी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे शालू कैफ या महिलेने जन्म दिला होता. चौकशीसाठी बाळाची आई शालू कैफ शेख, तृतीयपंथीय राजू मनोहर वाघमारे या दलालासही नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले आहे. (Nashik News)दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे नवजात अर्भकांसह मुलांची विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याचे उघडकि आले आहे. मुंब्रा आणि नाशिक पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांची चौकशी सुरू केली असून, या संबंधित टोळीने आजपर्यंत किती मुलांची विक्री केली आहे. याचा तपास पोलिस करत आहेत.(Nashik News)
Nashik News | मालेगावात ८ वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत; ग्रामस्थांकडून रास्ता रोको
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम