Pandurang Sakpal | ठाकरे गटावर शोककळा; निष्ठावंत शिवसैनिकाचे निधन

0
57
Pandurang Sakpal
Pandurang Sakpal

मुंबई:  बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ (Pandurang Sakpal) यांचे शनिवारी वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर मुंबईत लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज संध्याकाळी पाच वाजता गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यविधी केले जाणार आहेत. पांडुरंग सकपाळ यांच्या निधनाने ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे.

दक्षिण मुंबईतील एक निष्ठावंत शिवसैनिक (Shivsena) म्हणून पांडुरंग सपकाळ ओळखले जात होते. ते शिवसेनेच्या जुन्या नेत्यांपैकी एक असून, बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू साथीदार होते. शिवसेनेतील फुटीनंतरही ते उद्धव ठाकरेंसोबत होते. दक्षिण मुंबईत शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

त्यांनी 12 वर्षे दक्षिण मुंबईच्या प्रभाग क्रमांक १२ च्या विभाग प्रमुखपदाची जबाबदारी पार पाडली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी 2023 मध्ये दक्षिण मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यावेळी हे पद काढले होते. तसेच पांडुरंग सकपाळ यांनी भाजप-शिवसेना युतीच्या काळात 2019 मध्ये मुंबादेवी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. (Pandurang Sakpal)

Malegaon | मालेगावचे माजी आमदार शेख रशीद यांचे निधन

Pandurang Sakpal | अजान स्पर्धेचे आयोजन केल्याने वादात 

पांडुरंग सकपाळ यांनी एका अजान स्पर्धेचे आयोजन केले होते. यामुळे ते वादात सापडले होते. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहत असल्याने माझ्या कानावर रोज अजान पडत असते. अजानमध्ये प्रचंड गोडवा आहे आणि अजानचं मला नेहमीच अप्रूप वाटतं. त्यामुळेच मुस्लिम मुलांसाठी अजान स्पर्धा घेण्याचा विचार मनात आला. या स्पर्धेत अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, आवाज आणि त्यांचे पाठांतर पाहून त्यांना बक्षीस दिले जाईल. या स्पर्धेचा खर्च शिवसेना करणार असल्याचे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. दरम्यान, या मुद्द्यावरुन भाजप नेत्यांनी ठाकरे गटावर टिका केली होती. (Pandurang Sakpal)

Baba Maharaj Satarkar| वारकरी संप्रदाय हळहळला; बाबा महाराज सातारकर यांचं निधन…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here