Nashik Lok Sabha Election | नाशकात आजी-माजी आमदारांमध्ये बाचाबाची; घाबरून मतदारांची पळापळ

0
72
Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election

Nashik Lok Sabha Election |  आज नाशिकमध्ये मतदान सुरू असून, एकीकडे शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर, आता आणखी एक प्रकरण समोर आले असून, नाशिकमध्ये भद्रकाली पोलीस ठाण्यासमोरच आजी माजी आमदारांचे समर्थक आमनेसामने आले आणि यावेळी दोन्ही आमदारांमध्ये बाचाबाची झाली.

जुने नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर माजी आमदार वसंत गीते (Vasant Gite) आणि भाजपच्या नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांच्यात भद्रकाली पोलीस ठाण्यासमोरच बाचाबाची झाली. यावेळी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.  (Nashik Lok Sabha Election)

शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद शाळेतील मतदान केंद्रावर मतदान (Voting) झाल्यानंतर लोक उभे राहत असल्याची तक्रार आणि ठाकरे गटाकडून पैसे वाटप सुरु असल्याचेही आरोप आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून करण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.  (Nashik Lok Sabha Election)

Nashik Lok Sabha Election | शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

नाशिकची निवडणुक निष्ठावान विरुद्ध गद्दार

या प्रकरणी माजी महापौर विनायक पांडे यांनी “मतदारांमध्ये उत्साह असल्याने भाजप हे बिनबुडाचे आरोप करत आहे. तसेच ही नाशिकची निवडणुक निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी असल्याने भाजप दडपशाहीचा वापर करत असल्याचेही आरोप विनायक पांडे यांनी केले आहेत. (Nashik Lok Sabha Election)

Nashik Lok Sabha Election | मतदारांनी पळापळ सुरू केली… 

यावेळी ही तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना येथून पांगवले. येथे काहीकाळ गोंधळ आणि तणाव निर्माण झाल्याने मतदारांमध्ये भीती होती. जे मतदार मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी रांगेत उभे होते. त्यांनी मतदान केंद्रातून पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवले आणि परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आणली.  (Nashik Lok Sabha Election)

Nashik Lok Sabha | माजी आमदारांचे कांद्याच्या माळा घालून मतदान; चांदवडमध्येही तरुणांचा निषेध


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here