Nashik Lok Sabha Election | शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

0
25
Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election

Nashik Lok Sabha Election |  आज नाशिक लोकसभा मतदार संघात मतदान पार पडत आहे. यात सकाळी शांतीगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मतदान केले. यावेळी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेल आई फूल वाहन पूजा केली. तर, मतदान केल्यानंतर त्यांनी ईव्हीएम मशीनला हारा घातला. या प्रकरणी विरोधकांनी आचारसंहिता भांगाचा आरोप केला होता. यानंतर अता अखेर त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांच्यात ‘काटे की टक्कर’ होणार असल्याचे दिसत आहे. यातच आता शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाल्याने या निवडणुकीत ट्विस्ट आला आहे.

Nashik Lok Sabha | माजी आमदारांचे कांद्याच्या माळा घालून मतदान; चांदवडमध्येही तरुणांचा निषेध

शांतीगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ

आज सकाळच्या सुमारास तिन्ही उमेदवारांनी मतदान केले असून, अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रवर आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, मतदान केल्यानंतर त्यांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला. हा आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची सविस्तर माहिती मागवली होती. यापूर्वीही महाराजांनी नामनिर्देश पत्रात आपल्यावर दाखल गुन्हा लपवल्याचे प्रकरण प्रलंबित असून, त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

Shantigiri Maharaj | ईव्हीएमला घातला हार; गुन्हा दाखल होण्याची शक्यता..?

Nashik Lok Sabha Election | कार्यकर्त्यांच्या कुर्त्यांवर ‘जय बाबाजी’

दरम्यान, सकाळीच म्हसरूळ येथे तदान केंद्रावर चिठ्ठ्या वाटत असताना शांतीगिरी महाराजांच्या एका सहकाऱ्याला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली असतानाच अंबड येथे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कुर्त्यांवर ‘जय बाबाजी’ असा शब्द लिहिलेला होता. यामुळे पोलिसांनी यावर आक्षेप घेतला होता.

यानंतर स्वतः शांतीगिरी महाराज हे अंबड पोलीस ठाण्यात आले आणि “आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात का घेतले?” असा जाब त्यांनी पोलिसांना विचारला. तर, या प्रकरणी बाबाजी हे काही उमेदवाराचे नाव नाही किंवा चिन्हही नसल्याचा दावा शांतीगिरी महाराजांनी केला. तर, हार घातल्याप्रकरणी “आम्ही इव्हीएमला नाही तर मतदान कक्षाच्या बोर्डला हार घातला. कारण त्यावर भारत मातेचे चित्र होते”, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here