North Maharashtra | नाशकात आज तोफा थंडावणार; कोणाच्या आणि कुठे सभा होणार..?

0
71
North Maharashtra
North Maharashtra

North Maharashtra |  राज्यात येत्या २० मे रोजी शेवटच्या टप्प्याचे  मतदान होणार असून, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभमीवर आज सर्व बड्या नेत्यांनी हे मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) या शेवटच्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाची अशी धुळे, नाशिक आणि दिंडोरी या मतदार संघांचा समावेश आहे. तर, आज या मतदार संघांमध्ये प्रचाराची सांगता होणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने या मतदार संघांमध्ये राजकीय सभांचा धडाका सुरू आहे.

North Maharashtra | या नेत्यांच्या आज सभा 

दरम्यान, आज निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवस असून, गेल्या आठवडाभरापासून सर्व उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. गेल्या १५ तारखेपासून तर रोज दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाकाच सुरू आहे. आज शेवटच्या दिवशी मालेगाव येथे धुळे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडणार आहे. तर, कॉंग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ अमोल कोल्हे यांची सभा होणार आहे.(North Maharashtra)

Nashik Loksabha | नाशिक लोकसभेचे गणित..; कमकुवत, मजबुत बाजु आणि जनतेचा कौल..?

तसेच नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचारार्थ रिपाईचे नेते रामदास आठवले यांची सातपूर सभा होणार आहेत. तर, वंचितचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारार्थ आज वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचीही सभा होणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ अमोल कोल्हे यांची सभा होणार आहे. त्यामुळे आज उत्तर महाराष्ट्रात एकूणच राज्यातील दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडणार आहे.

छगन भुजबळ सक्रिय नाहीच..?

सुरुवातीपासूनच राजकीय नाट्यमय घडामोडींमुळे नाशिकची जागा चांगलीच चर्चेत आहे. उमेडवररी नात्यानंतर येथे नाराजी नाट्य सुरू होते. तर, गोडसेंची उमेदवारी जाहीर झाल्याने छगन भुजबळांच्या नाराजीची चर्चा सुरू होती.  या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे नेते गिरीश महाजन, शिवसेनेचे दादाजी भुसे, गोपीचंद पडळकर, यांसारख्या अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे छगन भुजबळ हे नाशिकमध्ये पूर्ण ताकदीने सक्रिय असल्याचे दिसलेच नाही.  (North Maharashtra)

Nashik Loksabha | नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गट आमने सामने; तर, शिंदेंनी चालवला काल्पनिक बाण

पवारांवर कांदा उत्पादकांची नाराजी, भास्कर भगरेंना साथ..?

तर, दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा प्रश्न अत्यंत संवेदनशील मुद्दा बनला असून, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतही त्याचे पडसाद उमटल्याचे दिसून आले. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मविआचे भास्कर भगरे विरुद्ध महायुतीच्या भारती पवार यांच्यात थेट लढत रंगली आहे. भारती पवारांना कांदा उत्पादकांच्या नाराजीचा फटका बसणार की भास्कर भगरेंना कांदा उत्पादकांची साथ मिळणार..? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here