Chhagan Bhujbal | नाशिक : नाशिकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. महायुतीत उमेदवारीच्या नाराजीनाट्यानंतर आता प्राचरातही नाट्यमय घडामोडी घडत आहेत. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवताच आज महायुतीच्या नाशिकमधील नेत्यांमध्ये जुंपल्याचे दिसत आहे.
नांदगावचे शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena) आमदार सुहास कांदे आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांच्यातील मतभेद हे अनेकवेळा समोर आले आहेत. दरम्यान, आता सुहास कांदे यांनी थेट भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्री छगन भुजबळ हे महायुतीचा युती धर्म पाळत नसून ते नांदगावमध्ये ‘तुतारी’चा प्रचार करत असल्याचे गंभीर आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.
Chhagan Bhujbal | प्रचार सोडून भुजबळांच्या भेटीला; गोडसेंना तारण्यासाठी मुख्यमंत्री नाशकात..?
Chhagan Bhujbal | भुजबळांकडून ‘तुतारी’चा प्रचार
दरम्यान, सुहास कांदे यांनी भुजबळांना घरचा आहेर दिला असून, यामुळे नाहसिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भुजबळ हे महायुतीचा धर्म न पाळता नाशिक नांदगाव तालुक्यात विरोधक असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या ‘तुतारी’ या चिन्हाचा प्रचार व प्रसार करीत असल्याचे आरोप सुहास कांदे यांनी भुजबळांवर केले आहे.
मंत्रीपदं महायुतीकडून घ्यायचे आणि…
मंत्रीपदं महायुतीकडून घ्यायचे आणि प्रचार प्रसार मात्र महायुतीचा युती धर्म न पाळता करायचा. यापेक्षा मंत्री छगन भुजबळांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि खुशाल ‘तुतारी’चा प्रचार करावा, असं खुलं आव्हान भुजबळांना आमदार सुहास कांदे यांनी दिलं आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचा मेळावा आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी पार पडला असता, यावेळी त्यांनी हे आरोप केले आहेत.
Chhagan Bhujbal | गोडसेंवर ओबीसी समाज नाराज; मतपेटीत ताकद दाखवणार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम