द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; गुन्हेगारी प्रवृत्तीने आपली सीमा ओलांडल्याची घटना घडली आहे. मनमाड (Manmad) येथे पोलिसांवरच (Police) हल्ला केल्याची घटना घडली आहे.
मागील काही दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यात (District) गुन्हेगारी प्रवृत्तीने तोंड वर काढलेले आहे. ज्यामुळे बऱ्याच दुर्दैवी घटना घडल्या आहेत.
आता नाशिक मधल्या मनमाड येथे थेट ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरच गुन्हेगारांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
बुधवारी ऑन ड्युटी (On Duty) असणाऱ्या उगलमुगले या पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा चाकू हल्ला गुन्हेगारांनी केला आहे. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी उगलमुगले गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपाचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात हत्या, हल्ले असे प्रकार सर्रास घडून आले आहेत. गुन्हेगारांवर वचक ठेवणाऱ्या पोलिसांना देखील आता या गुन्हेगारांच्या प्रवृत्तीला बळी पडावे लागले आहे.
पोलीस कर्मचारी उगलमुगले हे वॉरंट बजावण्यासाठी गेले होते. ज्यात त्यांच्या समवेत अजून दोन पोलीस कर्मचारी होते.
मात्र गुन्हेगारांची मजल इथे पर्यंत गेली की, त्यांनी थेट पोलिसांवरच हल्ला केला. तीन गुन्हेगारांच्या टोळीने पोलिसांवर हल्ला करत, चोपरने पोटावर वार केले.
या हल्ल्यात पोलीस कर्मचारी उगलमुगले गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ला करणारे हे सराईत गुन्हेगार असल्याचे सांगण्यात येत आहे. या तिघ्या हल्लेखोरांपैकी एकास अटक करण्यात आली आहे. तर दोघे जण फरार आहेत.
गुन्हेगारांच्या या प्रवृत्तीने चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यांची इथपर्यंत मजल गेली की, त्यांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवला.
पोलीस फरार आलेल्या इतर दोघांचा शोध घेत आहेत.
ही बातमी वाचलीत का?
भारतात इंधनाचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील कर अनुक्रमे 5 आणि 10 रुपायांनी कमी केले. त्यामुळे पेट्रोल – डिझेल चे दर खूप कमी झाले.
केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्यानंतर अनेक राज्यांनी देखील पेट्रोल – डिझेल चे दर आपापल्या स्तरावर कमी केले.
त्यात आता दिल्ली सरकारने देखील पेट्रोल चे दर अजून 8 रुपयांनी कमी केले आहेत. यामुळे दिल्लीकरांना खूप दिलासा मिळाला आहे.
दिल्लीत केजरीवाल यांनी पेट्रोलचे दर कमी केले. त्याप्रमाणे आधी बऱ्याच राज्यांनी देखील पेट्रोल चे दर कमी केले.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम