Lok Sabha Election phase 3 | राज्यातील ‘या’ ११ हायव्होल्टेज जागांवर आज मतदान

0
43
Igatpuri
Igatpuri

Lok Sabha Election phase 3 |  आज देशात तिसऱ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यात राज्यातील ११ हायव्होल्टेज मतदार संघांचा समावेश आहे. यात बारामतीमधील ननंद विरुद्ध भावजय, माढा, आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गसह केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत या लढतींचा समावेश आहे. दरम्यान, या मतदार संघांमध्ये सत्तेत असलेले गट आणि विरोधी बाकावर असलेले गट यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

यापैकी संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे ते बारामतीमधील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीकडे. कारण येथे अप्रत्यक्षरीत्या काका पुतण्यात ही लढत असून, येथे या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे बारामतीत यंदा विकासाच्या मुद्द्यावर मतदान होणार की सहानुभूतीचे वारे वाहणार आणि बारामतीकर चौथ्यांदा लेकीला दिल्लीला पाठवणार की सुनेला संधी देणार हे पहावे लागणार आहे. (Lok Sabha Election phase 3)

दरम्यान, महाराष्ट्रातील निवडणुकीतला तिसरा टप्पा हा सर्वात हायव्होल्टेज लढतीचा टप्पा आहे. बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, रायगड, सोलापूर, लातूर या ११ मतदार संघांत आज मतदान होणार आहे.

Lok Sabha Election Phase 2 | देशात दुसऱ्या टप्प्याचे मतदान; राज्यातील गावांचा मतदानावर बहिष्कार

Lok Sabha Election phase 3 | मतदार संघ आणि उमेदवार 

वरील या ११ मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी प्रचारासाठी शर्थीचे प्रयत्न केले असून, आज या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. दरम्यान, कोणत्या मतदार संघांमध्ये कोणत्या उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. हे बघूयात…

  1. बारामती –  शरद पवार गट – सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गट – सुनेत्रा पवार
  2. सातारा – भाजप – उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गट – शशिकांत शिंदे
  3. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – भाजप – नारायण राणे विरुद्ध ठाकरे गट – विनायक राऊत
  4. धाराशिव – ठाकरे गट – ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गट – अर्चना पाटील
  5. सांगली – ठाकरे गट – चंद्रहार पाटील विरुद्ध भाजप – संजय काका आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील
  6. माढा – भाजप – रणजित नाईक-निंबाळकर विरुद्ध शरद पवार गट – धैर्यशील मोहिते-पाटील
  7. कोल्हापूर – काँग्रेस – शाहू महाराज छत्रपती विरुद्ध शिंदे गट – संजय मंडलिक
  8. हातकणंगले – धैर्यशील माने विरुद्ध सत्यजीत पाटील
  9. रायगड – अजित पवार गट – सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते
  10. सोलापूर – काँग्रेस – प्राणिती शिंदे विरुद्ध भाजप – राम सातपुते
  11. लातूर –  सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजीराव काळगे

Lok Sabha Election Phase 1 | ‘या’ मतदार संघांमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान

अशी लढत असणार आहे. दरम्यान, या ११ ही जागांवरील या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, या लढती मोठ्या औत्सुक्यपूर्ण असणार आहे.  (Lok Sabha Election phase 3)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here