Chhagan Bhujbal | नाशिकमध्ये सध्या महायुती आणि महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडे नाराजी नाट्य सुरू आहे. ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने जिल्हाप्रमुख विजय करंजकर नाराज असून, त्यांनी काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, दुसरीकडे महायुतीत शिंदे गटाने शेवटच्या क्षणी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्याने महायुतीचे इतर इच्छुक उमेदवार नाराज आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघावरून नाट्यमय घडामोडी सुरु होत्या. एकीकडे खासदार हेमंत गोडसे मुंबई, ठाणे वारी करत होते. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही उमेदवारीसाठी जोर लावला होता. तर नाशिक भाजपचा बालेकिल्ला असून, ही जागा भाजपकडे घ्यावी, यासाठी स्थानिक भाजप नेतेही आग्रही होते. हे सुरू असतानाच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अचानक लोकसभा निवडणुकीतून जाहीर माघार घेतली. त्यानंतर त्यांनी उमेदवारी जाहीर होत नसल्याचे कारण पुढे करत महायुतीला घरचा आहेर दिला.
Chhagan Bhujbal | भुजबळांना उमेदवारी न देणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचा जाहीर निषेध
‘आता तरी उठ ओबीसी जागा हो..!!’
दरम्यान, दिल्लीतून छगन भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. मात्र, तरीही महायुतीच्या नेत्यांनी त्यांना डावलून हेमंत गोडसेंना तिकीट दिल्यामुळे नाशिकमधील ओबीसी समाज (OBC Community) नाराज आहे. ओबीसी समाजाने नाशिकमध्ये होर्डींग्स लावले असून, यावर “आम्ही ७० टक्के ओबीसी आहोत आणि तरीही तिकीट मिळाले नाही.’उठ ओबीसी जागा हो..!!’ असा मजकूर या होर्डींग्सवर आहे. तरी मतपेटीत आपली ताकद दाखवण्याचे आवाहनही याद्वारे करण्यात आले आहे. त्यामुळे आधीच प्रचारासाठी कमी दिवस उरल्याने आणि मित्र पक्षांतही अंतर्गत नाराजी असल्याने आधीच कोंडीत सापडलेल्या हेमंत गोडसेंच्या अडचणी वाढणार आहेत. (Chhagan Bhujbal)
Chhagan Bhujbal | गोडसेंच्या उमेदवारीवर भाजप नाराज
दरम्यान, हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप नेत्यांकडून विरोध होता. तर, त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही भाजप नेते फारकाही खुश नव्हते. गेल्या तीन वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत असलेले भाजप नेते दिनकर पाटील हे गोडसे यांना उमेदवारी दिल्याने नाराज होते. मात्र, काल दशरथ पाटील यांनी आपण माघार घेत असून, विधानसभेची तयारी करणार असल्याचे सांगितले. तर, गोडसेंच्या कामावर नाखुश असल्याने मतदारसंघातही त्यांच्याविरोधात नाराजीचे वातावरण आहे. (Chhagan Bhujbal)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम