Hemant Godse | बहुप्रतीक्षित अशा नाशिकच्या जागेचा तिढा हा आज सुटलेला असून, अखेर इतक्या हाय व्हॉल्टेज ड्रामा नंतर शिंदे गटाने आपली सिटिंग सीट राखत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या जागेबाबत वाद सुरू होता. तिन्ही पक्ष आग्रही असल्याने या जागेवर उमेदवार जाहीर होत नव्हता. काल भाजप आणि राष्ट्रवादीने या वादातून माघार घेतल्यानंतर हि जागा शिंदे गटाच्या वाट्याला आली असून, विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. (Hemant Godse)
मुख्यमंत्री येणार, राज ठाकरेही आमंत्रित
दरम्यान, नाशिकमध्ये पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, ३ मे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे महायुतीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉ. भारती पवार आणि नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोंडसे या दोघांचाही उमेदवारी अर्ज उद्या दाखल केला जाणार आहे. त्यामुळे उद्या नाशिकमध्ये महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मध्यमांसोबत बोलताना गोडसेंनी सांगितले की उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहू शकतात. तसेच नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, मंत्री छगन भुजबळ आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. (Hemant Godse)
Loksabha Candidate | महाराष्ट्रातील ४८ मतदार संघातील उमेदवारांची संपूर्ण यादी
तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आमंत्रित केले असून, तेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आधीच उमेदवारी जाहीर करण्यास उशीर झाल्याने आता गोडसेंना प्रचारासाठी अवघे १८ ते १९ दिवस मिळणार आहे. त्यामुळे जितके परिश्रम त्यांना तिकीट मिळवण्यासाठी घ्यावे लागले. तितकेच परिश्रम त्यांना आता प्रचार पूर्ण करण्यासाठी करावे लागणार आहे. त्यामुळे महायुतीचे इतर मित्रपक्षही याकामी त्यांना हातभार लावणार असून, महायुतीचे बडे नेते उद्या गोडसेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येण्याची शक्यता आहे. (Hemant Godse)
Loksabha Election | शिवसेनेकडून ‘या’ बहुप्रतीक्षित जागांवरील उमेदवार जाहीर
Hemant Godse | मनसे आणि हेमंत गोडसे यांचे जूने संबंध
मनसे आणि हेमंत गोडसे यांचे जूने राजकीय संबंध असून, त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही मनसेतूनच केली होती. त्यामुळे राज ठाकरे त्यांच्या प्रचाराला येणार का..? हे पहावे लागणार आहे. राज ठाकरे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गाचे भाजप उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ पहिली प्रचार सभा 4 मे रोजी कणकवली येथे घेणार आहेत. तर, आज मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनीही त्यांची भेट घेतली असून, या भेटीत श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची कल्याणमध्ये सभा घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. (Hemant Godse)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम