सोमनाथ जगताप – देवळा | एकीकडे दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू असताना दिंडोरीचे नाराज माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या बंडोखोरीवर शिक्कामोर्तब झाले आहे. येत्या 2 मे रोजी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सकाळी दहा वाजता हरिश्चंद्र चव्हाण यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असुन, बैठकीनंतर दिंडोरी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
अनामत रक्कम भरणा करण्यापासुन ते कायदेशीर बाबी पाडण्यात आल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांना आज सूचना देण्यात आल्याचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले. विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत गेल्या महीना भरापासून लोकसभा मतदार संघातील शेतकरी बांधव, भाजपा कार्यकर्ते, विविध आदिवासी संघटना, पक्ष संघटना, शेतकरी संघटना, जय बाबाजी भक्त परिवार, युवक संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण निर्णय घेतल्याचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले.
Dindori Lok Sabha | आता राष्ट्रवादीने माघार घ्यावी; गावितांनी भरला उमेदवारी अर्ज
Dindori | हेची फळ काय मम तपाला
संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने आपली पक्षनिष्ठा पाहिली आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघातील जनतेची सेवा करण्याऐवजी शेतकऱ्यांना, जनतेने, कार्यकर्त्यांना दम दिला जातोय. यामुळे कुठे नेऊन ठेवला भाजपा असेच म्हणावे लागेल.
जनता माझ्या सोबत
सत्ताधारी पक्षात असूनही शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नांवर आम्ही लोकसभेत रान पेटवून संपूर्ण निर्यात बंदी उठवली होती आणि शेतकऱ्यांची न्याय बाजू मांडली होती. बळी राजाला कधी दम दिला नव्हता. जमिनीवरच राहिलो कधी सत्तेची हवा डोक्यात जाऊ दिली नाही, असे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना ‘अभी नही तो कभी नही’ अशी साद घातली असून, उमेदवारी माघारीसाठी नाही तर विजयी होण्यासाठीच करणार असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
Dindori Lok Sabha | जयंत पाटलांना अपयश; गावित आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम