Nashik Loksabha | नाशिकच्या जागेवरून भाजपची माघार; आता शिंदेंनी निर्णय घ्यायचाय

0
40
Lok Sabha 2024
Lok Sabha 2024

Nashik Loksabha |  गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीत चढाओढ सुरू होती. तिन्ही पक्ष या जागेसाठी आग्रही होते. रोज या वादात काहीतरी नवीन घडामोडी घडत आहेत. दरम्यान, आज भाजप नेते गिरीश महाजन हे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची आणि मंत्री छगन भुजबळांची भेट घेतली. यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्षाने नाशिकच्या जागेवरील दावा सोडल्याची माहिती दिली आहे. (Nashik Loksabha)

“नाशिकच्या जागेबाबत आता आमचा आग्रह नाही. नाशिकच्या जागेचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेतील. हा निर्णय आता त्यांचा आहे”असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले आहे. भाजपकडून दिनकर पाटील, आमदार राहुल ढीकले हे इच्छुक होते. मात्र, आता भाजपने या वादातून माघार घेतल्याने भाजप उमेदवारांचा पत्ता कट झाला आहे. (Nashik Loksabha)

PM Narendra Modi | मोदींची पिंपळगावमध्ये सभा; भुजबळांची मोठी माहिती

भाजपने आणि कार्यकर्त्यांनी आग्रह सोडला 

नाशिकच्या जागेचा निर्णय हा ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनाच घ्यायचा आहे. हा तिढा लवकरात लवकर सोडावावाच लागेल. कारण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. त्यांनी आज मुंबईचा उमेदवार जाहीर केला अता नाशिकही करतील. नाशिकची निवडणूक ही पाचव्या टप्प्यात आहे. २० मे रोजी मतदान आहेआणि आता फक्त 20 दिवस बाकी आहेत. वीस दिवसात किती प्रचार करणार आहेत. मी आज दिंडोरी लोकसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आलो आहे. नाशिकच्या जागेबाबत एकनाथ शिंदे आणि अजितदादा बसवून ठरवतील. भाजपने आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह सोडलेला आहे. (Nashik Loksabha)

PM Narendra Modi | नाशिकमधून पंतप्रधान मोदी महायुतीचे उमेदवार..?

Nashik Loksabha | भुजबळ साहेब नाराज नाही

भुजबळ साहेब नाराज नाही. ते महायुतीतील मोठे आणि जबाबदार नेते आहेत. एका लोकसभेवरून नाराज होणारे नेते नाही. कुठल्याही कार्यकर्त्यांच्या भावना असतात. आपल्या नेत्यांनी लढायला पाहिजे. महायुतीत जेव्हा काही निर्णय होतात. तेव्हा सर्वांनीच त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे गरजेचे आहे आणि ती आम्ही करत आहोत, असेहू बावनकुळे म्हणाले. (Nashik Loksabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here