Nashik Lok Sabha | शांतीगिरी महाराजांनी भरला शिंदे गटाकडून अर्ज..!

0
46
Nashik Lok Sabha
Nashik Lok Sabha

Nashik Lok Sabha | महायुतीत नाशिकच्या जागेवरून खंडाजंगी सुरू असून, यातच आता या वादात आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. नाशिकच्या राजकारणात यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अपक्ष निवडणूक लढवणारे शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरताना तो शिवसेना शिंदेगटाकडून (Shivsena Shinde Faction) भरल्याची मोठी बातमी समोर आली आहे. (Nashik Lok Sabha)

शांतीगिरी महाराज हे नाशिक लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणुक लढवणार होते. पहिल्या दिवशी त्यांनी मुहूर्तानुसार अर्ज भरला होता. मात्र, आज त्यांनी आपल्या भक्त परिवारासह मोठे शक्ति प्रदर्शन करत पुन्हा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आज गोदाघाट येथे त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले आणि त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.

Nashik Lok Sabha | नाशिक लोकसभेत नवा ट्विस्ट; भुजबळांची तिरकी राजकीय चाल..?

मात्र, यावेळी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी हा अर्ज शिवसेना शिंदे गटाकडून दाखल केला आहे. यामुळे नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप महायुतीकडून नाशिकच्या जागेची आणि उमेदवाराच्या नावाची कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, अचानक शांतीगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून अर्ज दाखल केल्यामुळे मतदार संभ्रमात पडले आहे. नेमकी ही काय खेळी आहे आणि  हे शांतीगिरी महाराजच महायुतीचे उमेदवार असणार का? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. (Nashik Lok Sabha)

Nashik Lok Sabha | मध्यरात्री मुख्यमंत्री, गोडसे अन् बोरस्तेंची गुप्त बैठक; आज सस्पेन्स संपणार..?

Nashik Lok Sabha | शांतीगिरी महाराजांनी चार अर्ज घेतले 

दरम्यान, आगेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून चढाओढ सुरू आहे. भुजबळांनी माघार घेतल्यानंतर गोडसेंच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे निश्चित होते. मात्र, त्यानंतर रोज नवनवीन नावे समोर येत होती. मात्र, कालपर्यंत अपक्ष उमेदवारी लढवणार असलेल्या शांतिगिरी महाराज यांनी आज शिंदे गटांकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.(Nashik Lok Sabha)

मात्र, त्यांच्या अर्जासोबत एबी फॉर्म जोडलेला नाही. शांतीगिरी महाराजांनी पहिल्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता आणि आता दुसऱ्यांदा त्यांनी शिंदे गटाकडून अर्ज भरला आहे. शांतीगिरी महाराजांनी एक दोन नाहीतर चार अर्ज घेतलेले असून, तेच महायुतीचे उमेदवार आहेत की यामागे काही नवी खेळी आहे, हे पहावे लागणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here